Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीसदगुरु नारायण महाराजांचं निधन ही* *अध्यात्मिक, पुरोगामी चळवळीची हानी* ...

श्रीसदगुरु नारायण महाराजांचं निधन ही* *अध्यात्मिक, पुरोगामी चळवळीची हानी*  *उपमुख्यंत्री अजित पवार यांची भावपूर्ण आदरांजली*

 

 

मुंबई, दि. 11 :- “पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील आदरणीय श्रीसदगुरु नारायण महाराज यांचं निधन ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. अध्यात्माच्या माध्यमातून लोकजागृती, लोकजागृतीतून लोकचळवळ, लोकचळवळीतून सामाजिक सुधारणा, पुरोगामी विचार गावोगावी पोहचवणाऱ्या श्रीसदगुरु नारायण महाराजांचे विचार आणि सेवाकार्य सर्वजण मिळून पुढे नेणं. सामुदायिक शेती, सामुदायिक विवाह, सामुदायिक श्रमदान, व्यसनमुक्तीचे त्यांचे कार्य अखंडीतपणे कायम ठेवणं हीच श्रीसदगुरु नारायण महाराजांना खरी आदरांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

——–000000——–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments