प्राईस बँड प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 249 ते 263 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
बोली सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी सुरु होईल आणि गुरुवार, 19 सप्टेंबर, 2024 रोजी संपेल. अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार 13 सप्टेंबर 2024 रोजी बोली लावता येईल.
कमीत कमी 57 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास 57 च्या पटीत बोली लावावी लागेल.
आरएचपी लिंक: https://www.axiscapital.co.in/wp-content/uploads/Northern-Arc-Capital-Limited-RHP.pdf
राष्ट्रीय, 11 सप्टेंबर, 2024: नॉर्दर्न आर्क कॅपिटल लिमिटेडचा आयपीओ सोमवार, 16 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे.
आयपीओमध्ये 5000 मिलियन रुपयांपर्यंतचे नव्याने जारी केलेले इक्विटी समभाग आणि समभागांची विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेले 10,532,320 पर्यंत समभाग यांचा समावेश असणार आहे.
प्राईस बँड प्रत्येक इक्विटी समभागासाठी 249 ते 263 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागासाठी बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना दर इक्विटी समभागासाठी 24 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
कमीत कमी 57 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास 57 च्या पटीत बोली लावावी लागेल.
या आयपीओमधून जे भांडवल उभे राहील त्याचा उपयोग भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, कंपनी ज्यावर विशेष भर देते अशी एमएसएमई फायनान्सिंग, एमएफआय, खरेदीसाठी कर्ज, गाडीसाठी कर्ज, परवडण्याजोग्या घरांसाठी कर्ज आणि शेतीसाठी कर्ज या क्षेत्रांसाठी तसेच आर्थिक वर्ष 2025 मध्ये भांडवल पर्याप्ततेविषयी आरबीआयच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी केला जाईल.
10,532,320 पर्यंतच्या इक्विटी समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये 3,844,449 इक्विटी समभाग लीपफ्रॉग फायनान्शियल इन्क्लुजन इंडिया (II) लिमिटेडकडून, 1,263,965 पर्यंत इक्विटी समभाग एकियन आफ्रिका-एशिया इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून, 1,408,918 पर्यंत इक्विटी समभाग 360 वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंडकडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड), 1,746,950 इक्विटी समभाग एट रोड्स इन्व्हेस्टमेंट मॉरिशस II लिमिटेडकडून (आधीची एफआयएल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट (मॉरिशस) II लिमिटेड), 1,344,828 पर्यंत इक्विटी समभाग द्वारा ट्रस्ट (त्यांचे प्रतिनिधित्व त्यांचे कॉर्पोरेट विश्वस्त द्वारा होल्डिंग्स करत आहेत) (आधीची द्वारा होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आणि द्वारा ट्रस्टीशिप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड), 923,210 इक्विटी समभाग सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनकडून प्रस्तुत करण्यात येत आहेत.
हे इक्विटी समभाग कंपनीने दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी भारतात चेन्नई येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, तामिळनाडू यांच्याकडे सादर केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात आहेत.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. या ऑफरसाठी एनएसई हे निर्देशित स्टॉक एक्स्चेंज आहे.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(1) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 50% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल तर वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 35% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. 590,874 पर्यंत (●) मिलियन रुपयांचे इक्विटी समभाग पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येतील, ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या बोली येणे आवश्यक आहे.
सर्व बिडर्स (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. बुक बिल्डिंग प्रक्रिया आणि ऑफर प्रक्रिया यांच्याशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी कृपया आरएचपीमधील पान क्रमांक 546 वरील “ऑफर प्रोसिजर” हा भाग वाचावा.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.
या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेल्या ज्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांची व्याख्या दिली गेलेली नाही त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये देण्यात आल्याप्रमाणे


