Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ‘हृयुंदाई स्‍पॉटलाइट कॉन्‍सर्ट्स'च्‍या २०२४ एडिशनचे आयोजन

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ‘हृयुंदाई स्‍पॉटलाइट कॉन्‍सर्ट्स’च्‍या २०२४ एडिशनचे आयोजन

गुरूग्राम । सप्‍टेंबर १२, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) या भारतातील स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने भारतातील फक्‍त ह्युंदाई ग्राहकांसाठी अनोखा सहभागात्‍मक उपक्रम ‘ह्युंदाई स्‍पॉटलाइट कॉन्‍सर्ट्स’च्‍या २०२४ एडिशनची घोषणा केली. यंदा या उपक्रमाचे दुसरे एडिशन आहे. हे लाइव्‍ह कॉन्‍सर्ट्स चेन्‍नई, मुंबई, गुवाहाटी, चंदिगड, बेंगळुरू आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्‍ये आयोजित करण्‍यात येतील, ज्‍यामध्‍ये भारतातील काही प्रख्‍यात परफॉर्मिंग आर्टिस्‍ट्स व संगीतकारांचा समावेश असेल.

 

या अद्वितीय ग्राहक-केंद्रित उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे पूर्ण-वेळ संचालक व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्‍ये आमचा व्‍यवहाराच्‍या अटींच्‍या पलीकडे जात ग्राहकांसोबत दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्‍यावर विश्‍वास आहे. आजीवन गतीशीलता सहयोगी म्‍हणून स्‍पॉटलाइट कॉन्‍सर्ट्स ब्रँड ह्युंदाईचा ग्राहकांसोबत असलेला विश्‍वास व प्रबळ नात्‍याला साजरे करण्‍याचा ह्युंदाई मोटर इंडियाचे मार्ग आहे आणि त्‍यामधून कंपनीचा ‘कस्‍टमर फर्स्‍ट’ दृष्टिकोन दिसून येतो. पहिल्‍या एडिशनला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍यानंतर मला विश्‍वास आहे की, यंदाच्‍या दुसऱ्या एडिशनला मोठे यश मिळेल आणि या उपक्रमाचा स्‍तर उंचावेल.”

 

दुसऱ्या एडिशनमध्‍ये एचएमआयएल प्रतिष्ठित आर्टिस्‍ट्सची सर्वोत्तम लाइन-अप, ट्रेण्‍डसेटिंग लाइव्‍ह परफॉर्मेन्‍सेस आणि विविध शहरांमध्‍ये विशेषरित्‍या डिझाइन केलेल्‍या कस्‍टमर एक्‍स्‍पेरिअन्‍स झोन्‍ससह ‘ह्युंदाई स्‍पॉटलाइट कॉन्‍सर्ट्स’ला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. ह्युंदाई ग्राहक या लक्षवेधक अनुभवाचा भाग होण्‍यासाठी जवळपास चार सदस्‍यांसह नोंदणी करू शकतात.

 

‘ह्युंदाई स्‍पॉटलाइट कॉन्‍सर्ट्स’ प्रथम २०२३ मध्‍ये लाँच करण्‍यात आले, जेथे चार शहरांमध्‍ये कॉन्‍सर्ट्सचे आयोजन करण्‍यात आले होते. या कॉन्‍सर्ट्सना मोठे यश मिळाले, ८,५०० हून अधिक ग्राहकांनी त्‍यांच्‍या प्रियजनांसोबत हे लाइव्‍ह परफॉर्मन्‍स पाहण्‍याचा आनंद घेतला. २०२४ मध्‍ये, एचएमआयएलने नवी दिल्‍ली, कोलकाता, लखनौ आणि कोची येथे अशा प्रकारच्‍या चार कॉन्‍सर्ट्सचे आयोजन केले आहे.

 

शहर

 

दिनांक

 

आर्टिस्‍ट

 

स्‍थळ

 

चेन्‍नई

 

सप्‍टेंबर १४, २०२४

 

अँड्रीया जेरेमिया आणि स्टिफन डेव्‍हसी

 

चेन्‍नई ट्रेड सेंटर, नंदम्‍बक्‍कम

 

मुंबई

 

सप्‍टेंबर २८, २०२४

 

शंकर एहसान लॉय आणि शाल्‍मली खोलगडे

 

एनएससीआय डोम, वरळी

 

गुवाहाटी

 

ऑक्‍टोबर ५, २०२४

 

पॅपोन आणि शंकुराज कोंवर

 

इंदिरा गांधी अॅथलेटिक स्‍टेडियम, नालापरा

 

चंदिगड

 

ऑक्‍टोबर १९, २०२४

 

नेहा कक्‍कर आणि सुखे

 

शालीमार ग्राऊंड, सेक्‍टर ५, पंचकुला

 

बेंगळुरू

 

ऑक्‍टोबर २६, २०२४

 

शंकर एहसान लॉय आणि विजय प्रकाश

 

कर्नाटक ट्रेड प्रमोटर्स ऑर्गनायझेशन (केटीपीओ), व्‍हाइटफिल्‍ड

 

अहमदाबाद

 

नोव्‍हेंबर २४, २०२४

 

 

सोनू निगम आणि आकासा

 

विवेन्‍झा बाय गोपी फार्म, ओग्‍नाज

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments