पुणे, १० जानेवारी २०२४ : द वर्ल्ड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे भुवनेश्वर,ओडिशा करिता धीमान मझुमदार यांची मुख्य कामकाज अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून डब्ल्यूजीएच आणि लाइफ हॉटेल्स या दोन ब्रँडचे कामकाज ते पाहणार आहेत. 30 वर्षांहून अधिक कालावधीच्या प्रभावी कारकिर्दीसह,धीमान मझुमदार यांच्याकडे आदरातिथ्य क्षेत्रातील अनुभव असून त्यांनी संपूर्ण भारतात अनेक हॉटेल्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले आहे.द वर्ल्ड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्समध्ये सामील होण्याआधी मझुमदार यांनी द मेफेअर ग्रुप ऑफ हॉटेल्स करिता विक्री विभागाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. यापुढे धीमान मुझुमदार यांची हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या वाढीवर देखरेख आणि ब्रँडच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका राहणार आहे.


