दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे उपराष्टपती मा जगदिप धनखड यांच्या हस्ते राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये स्थापित करण्यांत आलेल्या संविधान मंदिराचे उदघाटन एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय मुंबई 01 या संस्थेतून ऑनलाईन पध्दतीने करण्यांत आले आहे.
तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथे सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ विधान सभा मतदार संघ , संस्थेचे प्राचार्य श्री महेश जाधव, AMMA आध्यक्ष अंबरनाथ श्री उमेश तायडे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री कळसकर अंबरनाथ पोलीस स्टेशन, ॲडव्होकेट दिलीप मेहेर आदी मान्यवर तसेच आजी -माजी प्रशिक्षणार्थी व पालक उपस्थित होते.
मा आमदार यांनी अत्यंत उत्तमरित्या उपस्थित समुदायाला संविधाना बाबत संबोधित केले आहे.
संविधान मंदिराच्या उद्घाटनानिमित्त दिनांक 12 ते 14 सप्टेबर रोजी संस्थेतील प्रशिक्षार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यांत आल्या होत्या. सदर स्पर्धेतील गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रे वितरीत करण्यांत आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील गटनिदेशक श्री जे एस भामरे, श्री व्ही एल, पाटील, व संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी अंत्यत चांगल्या प्रकारे योगदान दिले आहे व सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री बी बी संदानशिव यांनी केले


