पुणे,१६ सप्टेंबर २०२४ : ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने आपल्या स्पर्श संजीवनी आरोग्यसेवा उपक्रमांतर्गत 10 टेलीमेडिसिन केंद्र आणि 4 मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात आले आहेत.हा उपक्रम भारतातील ४ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविला जाणार जाणार असून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख अशा भारतातील काही सर्वोच्च उंचीवर असलेल्या ठिकाणांचा देखील यात समावेश आहे. दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते टेलिमेडिसिन सेंटर्स आणि मोबाईल मेडिकल युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले.


