चेन्नई, १२ सप्टेंबर २०२४: मोबिल या ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकण्ट्समधील अग्रणी कंपनीने ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चेन्नई फॉर्म्युला रेसिंग सर्किट येथे इंडियन रेसिंग फेस्टिवल २०२४दरम्यान चेन्नईमध्ये भारतातील पहिल्या नाइट स्ट्रीट रेससाठी रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड (आरपीपीएल) सोबत सहयोग केला. या उल्लेखनीय इव्हेण्टसह मोबिलने सलग तिसऱ्या वर्षी इंडियन रेसिंग फेस्टिवलसोबत सहयोग केला, ज्यामधून गती, कौशल्य, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेचे भव्य संयोजन दिसून येते.
इंडियन रेसिंग लीग आणि फॉर्म्युला ४ चॅम्पियनशीपसाठी ऑफिशियल ल्युब्रिकण्ट पार्टनर असलेल्या मोबिल ने भारतीय मोटरस्पोर्ट्सला प्रगत करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेला दाखवले, जेथे कंपनीचे परफॉर्मन्स बाय मोबिल १वर लक्ष केंद्रित आहे. आरपीपीएलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवलअंतर्गत संपूर्ण नोव्हेंबर २०२४ महिन्यामध्ये देशभरात पाच आकर्षक फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेण्टने मोबिल १ च्या भारतातील ५० वर्षांच्या उपस्थितीला देखील साजरे केले.
याप्रसंगी मत व्यक्त करत एक्झॉनमोबिल ल्युब्रिकण्ट्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विपीन राणा म्हणाले, आम्हाला इंडिया रेसिंग वीकचा भाग असल्याने सन्माननीय वाटत आहे. ही इव्हेण्ट जागतिक मोटरस्पोर्ट्स प्रगत करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला दाखवते, तसेच भारतातील रेसिंगच्या भविष्याला गती देखील देते. गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही मोबिल™ उत्पादनांमधून देण्यात आलेल्या आत्मविश्वासासह रेसर्स व उत्साहींना त्यांच्या क्षमता अनलॉक करण्यास सक्षम केले आहे.
आरपीपीएलचे अध्यक्ष श्री. अखिलेश रेड्डी म्हणाले, आम्हाला मोबिल सोबत या सहयोगाचा अत्यंत अभिमान वाटत आहे, तसेच भारतातील पहिल्या नाइट स्ट्रीट रेसला प्रत्यक्षात आणण्याचा आनंद होत आहे. नाइट रेसिंगचा उत्साह व ऊर्जेने फेस्टिवला नवीन आकार दिला आहे, ज्यामधून आमच्या रेसर्सचे टॅलेंट व आवड दिसून येते. एफ४ आणि आयआरएलच्या सर्व टीम्सचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनंदन आणि आम्ही भविष्यात हीच गती कायम राखण्यास उत्सुक आहोत.
या फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, जेथे सेलिब्रिटी टीमचे मालक जसे बॉलिवुड सितारे जॉन अब्राहम व अर्जुन कपूर, क्रिकेट लीजेण्ड सौरव गांगुली आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी या फेस्टिवलच्या उच्च दर्जाप्रती योगदान दिले.
भव्य पुरस्कार सोहळ्यासह इव्हेण्टची सांगता झाली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये विजेत्या टीम्स व व्यक्तींच्या अपवादात्मक कामगिरींना गौरविण्यात आले, ज्यामुळे भारतात मोटरस्पोर्टच्या भविष्याला गती देण्यामध्ये मोबिल १ ची भूमिका अधिक दृढ झाली आहे.
भारतातील एक्झॉनमोबिल बाबत
एक्झॉनमोबिल तीन दशकांपासून भारताच्या विकासाला पाठिंबा देत आहे.
कंपनीने वर्ष २००० च्या सुरूवातीला भारतासाठी लिक्विफाइड नॅच्युरल गॅस (एलएनजी)चा पहिला पुरवठा खरेदी केला आणि आता देशासाठी प्रमुख एलएनजी पुरवठादार आहे, तसेच गॅस-आधारित कंपनीमध्ये परिवर्तन होण्याच्या वाटचाल करत आहे.
एक्झॉनमोबिलचे अत्याधुनिक उत्पादन सोल्यूशन्स, जसे मोबिल ल्युब्रिकण्ट्स भारतातील ऑटोमोटिव्ह व औद्योगिक क्षेत्रांमधील उत्पादकता आणि ऊर्जा कार्यक्षमतेला गती देत आहेत, तसेच वैयक्तिक ग्राहक व व्यवसायांना कमी प्रयत्नासह अधिक यश संपादित करण्यासाठी मदत करत आहे. कंपनीची केमिकल उत्पादने भारतातील उत्पादकांना उच्च दर्जाची उत्पादने निर्माण करण्यास आणि अन्न प्रक्रिया, ग्राहकोपयोगी वस्तू, कृषी, जल प्रक्रिया, फार्मास्युटिकल्स व बांधकाम अशा क्षेत्रांमध्ये शाश्वत फायदे देण्यास सक्षम करत आहे.
एक्झॉनमोबिलची बेंगळुरूमधील व्यवसाय व तंत्रज्ञान केंद्रे कंपनीच्या जागतिक कार्यसंचालनांना महत्त्वपूर्ण पाठिंबा देतात. तंत्रज्ञान केंद्रे जागतिक उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि मेड-इन-इंडिया उत्पादनांची जागतिक परिणामकारकता वाढवण्याकरिता स्वदेशी उत्पादकांसोबत सहयोग करण्यासाठी धोरणे आखण्यामध्ये मदत करतात.
भारतातील एक्झॉनमोबिल ल्युब्रिकण्ट्सबाबत अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.mobil.co.in/en-in.
भारतातील मोबिल ल्युब्रिकण्ट्सबाबत अधिक बातम्या व माहितीसाठी, आम्हाला येथे फॉलो करा –
Graphical user interface, application
Description automatically generatedGraphical user interface, application
Description automatically generatedGraphical user interface, application
Description automatically generatedGraphical user interface, application
Description automatically generatedGraphical user interface, application
Description automatically generated
एक्झॉनमोबिल कॉर्पोरेशनच्या अनेक सहयोगी कंपन्या आहेत, ज्यामध्ये एक्झॉनमोबिल, एक्झॉन, ईसो आणि मोबिल यांचा समावेश आहे. सोईस्करपणा व साधेपणासाठी ‘कॉर्पोरेशन’, ‘कंपनी’, ‘एक्झॉनमोबिल’, ‘ईएम’प्रती संज्ञा व संदर्भ आणि इतर त्याच प्रकारच्या संज्ञा वापरण्यात आल्या आहेत, तसेच एक किंवा अधिक विशिष्ट सहयोगी किंवा संलग्न ग्रुप्सशी संबंधित असू शकतात.


