पुणे,19 सप्टेंबर 2024 : जगभरात मनुष्यबळाशी निगडीत सर्वोत्कृष्ट पध्दतींचा सन्मान करणाऱ्या टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्युट या संस्थेने ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ला भारतात टॉप एम्प्लॉयर 2024 म्हणून सन्मानित केले आहे. टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्युट तर्फे 20 विविध विषयांवर आधारित एचआर सर्वोत्कृष्ट पध्दतींच्या सर्वेक्षणानुसार कंपन्यांना प्रमाणित करते.या 20 विषयांमध्ये मनुष्यबळ धोरण, कामाचे वातावरण,वैविध्यता,समानता,प्रतिभा,सर्वसमावेशकता,कल्याण इत्यादींचा समावेश आहे.


