Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेस कडून गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील गार्डसील-९ या लसींबाबत जागरूकता...

पुण्यातील अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेस कडून गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील गार्डसील-९ या लसींबाबत जागरूकता निर्माणासाठी उपक्रम

पुणे, १९ सप्टेंबर २०२४: अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेस या आरोग्यसेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील गार्डसील-९ या लसीबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक सामाजिक उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी अलाइव्हच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, याचा उद्देश नऊ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला आणि मुलींना वेळेवर लसीकरण करून घेऊन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही लस उपलब्ध करून दिली जात असून, अलाइव्ह क्लिनिकमध्ये सोमवार ते शनिवार, सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या वेळेत ही लस घेता येईल.

 

 

 

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वांत सामान्य कर्करोगांपैकी एक असून, पाचपैकी एका महिलेच्या मृत्यूचे कारण हा कर्करोग असतो. दरवर्षी सुमारे ७४ हजार महिला या आजाराने मृत्यूमुखी पडतात. गार्डसिल-९ ही लस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग असून, ही लस गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी सर्वाधिक जबाबदार असणाऱ्या पॅपिलोमा व्हायरस विरुद्ध (एचपीव्ही) संरक्षण प्रदान करते. अलाइव्हचा हा उपक्रम केवळ लसीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी नाही, तर ती किफायतशीर किमतीत उपलब्ध होण्यातील अडथळे दूर करण्यासाठीचा देखील प्रयत्न आहे. ही लस सहज आणि किफायतशीर किमतीत उपलब्ध केल्यामुळे अधिकाधिक महिला या जीवनरक्षक उपायाचा लाभ घेऊ शकतील.

 

लसीबाबत माहिती:

 

नऊ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी गार्डसिल-९ या लसीची शिफारस केली जाते. याचे दोन ते तीन डोस ठराविक कालावधीनंतर घेणे आवश्यक असते. तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना, लसीकरण करण्यापूर्वी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये एचपीव्हीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी असले, तरीही पुरुषांनादेखील ही लस घेता येऊ शकते. ही लस या विषाणूच्या नऊ (स्ट्रेनपासून) प्रकारांपासून संरक्षण करते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी ७० टक्के कारणीभूत ठरणाऱ्या एचपीव्हीचे १६ आणि १८ हे प्रकार (स्ट्रेन) आणि जननेंद्रियावरील चामखिळीसाठी ९० टक्के कारणीभूत ठरणारे ६ व ११ या (स्ट्रेनना) प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी ही लस प्रभावी ठरते. एचपीव्हीमुळे होणारे योनिमार्ग, वल्व्हर, गुदद्वार आणि ऑरोफॅरिंजियल कर्करोगांना प्रतिबंधित करण्यासही ही लस मदत करते.

 

अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेसचे संस्थापक ऋषी तांदुळवाडकर म्हणाले, “ प्रतिबंध उत्तम आरोग्याचा आधारस्तंभ आहे, असा आमचा विश्वास आहे. समाजाप्रति आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही एचपी लसीबाबत जागरुकता वाढवण्याच्या उपक्रमाद्वारे प्रयत्न करत आहोत. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही लस उपलब्ध करून, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची सुरुवात होण्याआधी प्रतिबंध करण्यासाठी सक्षम करणे आणि लोकांना उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी मदत करणे हा आमचा उद्देश आहे.”

 

अतिशय प्रभावी असूनही, फक्त दोन प्रकारांपासून ( स्ट्रेनपासून) संरक्षण करणाऱ्या सर्व्हरिक्स सारख्या इतर लसींच्या तुलनेत गार्डसिल-९ ही लस नऊ (स्ट्रेन) प्रकारांपासून संरक्षण देते, ज्यात ३१, ३२,३३, ४५ ५२ आणि ५८ या प्रकारांचा समावेश आहे. यामुळे ही लस सर्वांत व्यापक एचपीव्ही लस आहे. यामुळे एचपीव्ही संबंधित

 

कर्करोगाचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी होतो. सर्व्हरिक्स ही लस फक्त महिलांसाठी आहे, तर गार्डसिल-९ पुरुष आणि महिला दोघांसाठीही वापरता येते. व्यापकता, सुरक्षा आणि परिणामकारकता यामुळे गार्डसिल-९ एचपीव्ही संबंधित कर्करोग आणि अन्य रोगांपासून सर्वोत्तम संरक्षण देते.

 

 

 

एचपीव्ही हा जगभरातील सर्वांत सामान्य संसर्गांपैकी एक आहे आणि जवळजवळ सर्व लैंगिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तींना त्यांच्या जीवनात कधीतरी याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. गार्डसिल-९ ही लस एचपीव्ही संबंधित रोगांपासून दीर्घकाळ संरक्षण प्रदान करते, त्यामुळे ती महिला आणि पुरुष दोघांसाठीही एक आवश्यक प्रतिबंधक साधन आहे. ही लस अधिक सहज उपलब्ध करून देशातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची प्रकरणे कमी करण्यासाठी मदत करणे हे अलाइव्हचे प्रथम उद्दिष्ट आहे.

 

हा उपक्रम अलाइव्हच्या समाजातील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देण्याचे व्यापक ध्येय प्रतिबिंबित करतो. अत्याधुनिक उपचारांद्वारे लोकांना त्यांचे आरोग्य आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी अलाइव्ह समर्पित आहे. हा उपक्रम अलाइव्हच्या सक्रिय आरोग्यसेवा आणि समाजाच्या कल्याणासाठीच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.

 

अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेसबद्दल –

 

ऋषी तांदुळवाडकर, डॉ. सुनीता तांदुळवाडकर आणि डॉ. राजेश तांदुळवाडकर यांनी २०१९ मध्ये स्थापन केलेले, अलाइव्ह पुनरुत्पादक औषधे आणि वैयक्तिक आरोग्य उपचारसुविधा पुरविण्यात आघाडीवर आहे. अलाइव्ह ऑटोलॉगस सेल फ्रॅक्शन थेरपी आणि शरीरातील नैसर्गिक उपचार प्रक्रियेस पाठबळ देण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रुग्णांच्या गरजेनुसार देण्यात येणाऱ्या आयव्ही ड्रीप फॉर्म्युलेशनमध्ये अग्रगण्य आहे. वृद्धत्व उत्तम आरोग्य, जीवनशक्ती, निरामयता यांनी परिपूर्ण असा एक सुंदर प्रवास म्हणून स्वीकारले जावे, अशा जगाला प्रेरणा देणे ही आमची मोहीम आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी किंवा भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी, कृ

पया अलाइव्हशी संपर्क साधा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments