पुणे,20 सप्टेंबर 2024 : स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सीडबी) आणि सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) यांच्या सहयोगाने लाँचपॅड 3.0 हा उद्योजकता विकास विषयातील सर्टिफिकेट कोर्स किवळे कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. हा तीन महिने कालावधी असलेला अभ्यासक्रम असून यामध्ये पूर्ण वेळ प्रशिक्षण,तीन औद्योगिक भेटी आणि एक वर्ष इनक्युबेशन साहाय्य यांचा समावेश आहे.
बारावी पास,आयटीआय किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून डिप्लोमा किंवा पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा नुकताच अनौपचारिकरित्या छोटा व्यवसाय सुरू केलेले व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत (18 ते 45 वयोगटातील व्यक्ती). अर्ज करायची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. वास्तविक अनुभवाद्वारे प्रशिक्षण याशिवाय प्रत्येक यशस्वी उपक्रमाला 30,000 रूपयांपर्यंत बीज निधी मिळण्याची संधी मिळू शकते.
सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि (सीडबी) यांच्या सहकार्याने सुरू केलेला हा अभ्यासक्रम रोजगार कार्यक्षम व्यावसायिक यांबरोबरच देशाला भविष्यात घेऊन जाणारे उद्योजक तयार करण्याच्या एसएसपीयूच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. एसएसपीयू हे फक्त अभ्यासक्रम व पदवीसाठी असलेली संस्था नसून उद्योजकेतची मानसिकता असलेल्या तरूणांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बळ देणारे व्यासपीठ आहे.सर्वोत्कृष्ट आणि अद्ययावत पायाभूत सुविधांसह उद्योजकतेला चालना देण्यासाठी एसएसपीयू हे एक योग्य ठिकाण आहे
.


