~ केएफसीने भारतातील पहिले ‘इंटरअॅक्टिव्ह साइन लँग्वेज किऑस्क’ लॉन्च केले ~
~ देशभरातील १७ हजार पेक्षा कर्मचाऱ्यांना देणार भारतीय सांकेतिक भाषेचे (ISL) प्रशिक्षण
राष्ट्रीय, १९ सप्टेंबर २०२४- एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी एका छोटासा संकेतही पुरेसा असतो. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाच्या निमित्ताने केएफसीने आदरातिथ्य उद्योगात एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केएफसी सर्व कर्मचाऱ्यांना सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण देणार आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण राबवणारे QSR (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट) म्हणजे जलद सेवा देणारे रेस्टॉरंट या प्रवर्गातील केएफसी हे भारतातील पहिले रेस्टॉरंट आहे. अशाप्रकारचा हा पहिल्यांदाच आयोजित केलेला प्रशिक्षण कार्यक्रम १७००० पेक्षा अधिक केएफसी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आहे. हे कर्मचारी १२०० पेक्षा अधिक रेस्टॉरंट्सच्या माध्यमातून २४० हून अधिक शहरांमध्ये सध्या कार्यरत आहेत. या ब्रँडच्या कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण ऑनलाइन असून सांकेतिक भाषेच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याची विविध प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे, त्यामुळे अगदी नवख्या व्यक्तीला भारतीय सांकेतिक भाषेची (ISL) मूलभूत माहिती मिळू शकेल. सुरुवातीला भारतीय सांकेतिक भाषेतील वर्णमाला शिकण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानंतर अभिवादन आणि नेहमीच्या वापरातील वाक्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. संभाषणांसाठी त्याचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे. हे प्रशिक्षण केएफसी इंडिया च्या ‘क्षमता’ या उपक्रमाचा एक भाग आहे. लोकांच्या अंगीभूत क्षमतांचा विकास करणे तसंच लिंगभेद भरून काढणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमातून, महिला तसंच कर्णबधिर व्यक्तींचा रेस्टॉरंट्समध्ये विकास करण्यासाठी केएफसी कटिबद्ध आहे आणि २०२६ पर्यंत कर्णबधिर कर्मचार्यांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे.
या वर्षी या #SpeakSign अभियानाच्या विस्ताराचा भाग म्हणून, केएफसीने भारतातील पहिले इंटरअॅक्टिव्ह साइन लँग्वेज किऑस्क आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी संपूर्ण आदरातिथ्य उद्योगाला एकत्र आणण्याचे केएफसीचा मानस आहे. या किऑस्कद्वारे लोक विविध ब्रँड्समधील खाद्यपदार्थ भारतीय सांकेतिक भाषेतून ऑर्डर कसे करायचे ते शिकू शकतात. हे प्रदर्शन सिलेक्ट सिटीवॉक, नवी दिल्ली आणि अँबियन्स मॉल, गुरुग्राम येथे सुरू करण्यात आले. तिथे ग्राहकांना पिझ्झा, बर्गर, डोसा, मोमोज, पास्ता, तसेच केएफसीचे हॉट अँड क्रिस्पी चिकन, पॉपकॉर्न, झिंगर यांसारखे ३० पेक्षा अधिक लोकप्रिय खाद्यपदार्थ सांकेतिक भाषेचा वापर करून ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना, केएफसी इंडिया आणि इतर पार्टनर कंट्रीजचे जनरल मॅनेजर मोक्श चोप्रा म्हणाले, “आमच्या केएफसी क्षमता कार्यक्रमाच्या माध्यमातून, कर्णबधिर समुदायाला संधी देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सांकेतिक भाषेचा प्रसार करणे हे त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. २०२१ पासून, आमचे वार्षिक #SpeakSign अभियान यासाठीच तयार केले आहे. यावर्षी, आमच्या १०० टीम्सना मूलभूत भारतीय सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे देशभरातील आमची रेस्टॉरंट्स अधिक सर्वसमावेशक होतील. सांकेतिक भाषेचा हा प्रवास आमच्या संस्थेपलीकडे नेऊन संपूर्ण आदरातिथ्य उद्योगात घेऊन जात आहोत. लोकप्रिय ठिकाणी असलेल्या इंटरअॅक्टिव्ह किऑस्कसह, आम्ही ग्राहकांना सांकेतिक भाषेत त्यांचे आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याचे शिक्षण देत आहोत.”
केएफसी इंडियाचे फ्रँचायझी भागीदार, देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड (DIL) आणि सफायर फूड्स इंडिया लिमिटेड (SFIL) यांनी क्षमता उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सफायर फूड्स इंडिया लिमिटेड (SFIL) चे अध्यक्ष आणि सीईओ दीपक तलुजा म्हणाले, “SFIL मध्ये प्रत्येकाला महत्त्व देणारी संस्कृती निर्माण करणे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आम्हाला केएफसी क्षमता या उपक्रमाचा अतिशय अभिमान आहे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण ही एक महत्त्वाची पायरी आहे. अशा लहान तरीही प्रभावी बदलामुळे एखाद्या व्यवसायात खरोखरच सर्वसमावेशक वातावरण कसे तयार होते हे दिसून येते. आम्ही SFIL मध्ये केएफसी क्षमता उपक्रमाद्वारे लोकांच्या क्षमता विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
हे इंटरअॅक्टिव्ह किऑस्क २१ सप्टेंबरपर्यंत सिलेक्ट सिटीवॉक, नवी दिल्ली आणि अँबियन्स मॉल, गुरुग्राम येथे उपलब्ध असतील.
२३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त ग्राहक देशभरातील ५४ विशेष केएफसी (कर्णबधिर कर्मचाऱ्यांकडून चालवले जाणारे) ला भेट देऊन टीम मेंबर्सतच्या मदतीने ISL शिकू शकतात. केएफसीच्या आवडीचे खाद्यपदार्थ सांकेतिक भाषेत कसे ऑर्डर करायचे याचे शिक्षण देण्यासाठी विशेष ‘साइन लँग्वेज बकेट्स’ आणि ‘साइन लँग्वेज मेनू’ देखील तयार करण्यात आले आहेत. तसेच केएफसीच्या सोशल मीडिया चॅनेल्स आणि वेबसाइटवर छोटे ट्यूटोरियल व्हीडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.


