Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिव्यांगांच्या कलात्मक वस्तूंचे 'प्रोत्साहन' प्रदर्शन सोमवारपासून (दि. २३)*  *दृष्टीहिन व्यक्तींची प्रात्यक्षिके...

दिव्यांगांच्या कलात्मक वस्तूंचे ‘प्रोत्साहन’ प्रदर्शन सोमवारपासून (दि. २३)*  *दृष्टीहिन व्यक्तींची प्रात्यक्षिके ; प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य*

 

 

पुणे : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासोबतच त्या स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२४ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर ते मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ८ यावेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील २८ दिव्यांग व्यक्ती आणि १२ संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

 

प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबेदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर यांनी केले आहे.

 

प्रदर्शनाचे उद््घाटन सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता दिव्यांगांसाठी ३५ वर्षे कार्यरत असलेल्या प्रिझम फाऊंडेशनची बेन्यू टेÑनिंग इन्स्टिटयूटच्या मुख्याध्यापिका विद्या भागवत आणि पीपल वीथ हीअरिंग इमपेअर्ड नेटवर्कचे महाराष्ट्राच्या अध्यक्षा कर्णबधिर अंबु गोविंदगिरी यांच्या हस्ते होणार आहे. फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

 

रंजना आठल्ये म्हणाल्या, सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. प्रदर्शनात १८ ते ८० वयोगटातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे. दृष्टिहीन व्यक्ती आपले दैनंदिन आयुष्य कसे व्यतीत करत असतील याचे कौतुक आणि कुतूहल प्रत्येकाला असते. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

 

प्रदर्शनात विद्या ज्योती स्पेशल स्कूल, विहान, अंध वृद्ध महिलाश्रम, नंदनवन, प्रिझम फाउंडेशन, मैत्र फाउंडेशन, स्मित फाउंडेशन, संवाद, उन्मेष संस्था इत्यादी भाग घेणार आहेत. प्रदर्शना दरम्यान धायरी येथील दृष्टीहिन वृद्ध महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करतील . त्याशिवाय वेळोवेळी दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम सादर करतील. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments