पुणे २२ सप्टेंबर २०२४ – देशातील रस्ते बांधकाम क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिक आणि गोल्फपटू गौरव गढोक यांची पूना क्लबच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गौरव हे पूना क्लबचे आतापर्यंतचे
सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
क्लबचा वारसा आणखी वाढविण्यासाठी नव्या कल्पना आणि वैचारिक दृष्टिकोन ठेवताना त्यासा तरुणाईची जोड देणार असल्याचे गढोक यांनी सांगितले. क्लबची परंपरा जपतच अधुनिकीकरण करण्यासाठी आपण वचनबद्ध राहू. अशा प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व करायला मिळणे ही सन्मानाची गोष्ट असून, पूना क्लबला अधिक उंचीवर नेण्यासाठी समितीसोबत करण्यास मी उत्सुक आहे, असेही गढोके म्हणाले.
बांधकाम क्षेत्रातील व्यग्र व्यावसायिक इंद्रनील मुजगुले यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मुजगुले हे देखिल एक चांगले गोल्फ खेळाडू आहेत. गढोक आणि मुजगुले या जोडीकडून एक भक्कम नेतृत्व अपेक्षित असून, त्याचा फायदा क्लबच्या वाढ आणि विकासास चालना देणारा ठरेल.
क्लबच्या २०२४ ते २०२६ अशा दोन वर्षाच्या कालावधीसाठी ९२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात आले.
पूना क्लब हा देशातील सर्वात प्रतिष्ठित क्लब असून, तो क्रिकेट मैदानाबरोबरच अन्य विस्तृत क्रीडा सुविधांसाठी ओळखला जातो. यामध्ये टेनिस, जलतरण तलाव, स्क्वॉश, बॅडमिंटन कोर्ट, बिलियर्ड्स अशा खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर पूना क्लबचे १८ होलचे पूर्ण गोल्फ कोर्सही आहे. अनेक संस्मरणीय स्पर्धांसाठी क्लब एक महत्वाचे व्यासपीठ ठरला आहे. गोल्फ खेळाडूंसाठी तेर हे एक उत्साही केंद्र बनले आहे. गढोक आणि त्यांच्या नव्या कार्यकारणीखील क्लब सतत यश आणि वाढीसाठी सज्ज असेल.
निवडून आलेले उमेदवार –
अध्यक्ष – गौरव गढोक (१५०६ मते), उपाध्यक्ष – श्री इंद्रनील मुजगुले (१४९० मते), समिती सदस्य – शशांक हळबे (१४५८), श्रीमती मोशी नागरकट्टी-मालवीय (१४१४), विजय अडवाणी (१३३७), पंकज शहा (१२९९)
———-


