Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुदतपूर्व प्रसुती झालेल्या अर्भकाला डेंग्यूची लागण; अंकुरा रुग्णालयात यशस्वी उपचार

मुदतपूर्व प्रसुती झालेल्या अर्भकाला डेंग्यूची लागण; अंकुरा रुग्णालयात यशस्वी उपचार

पुणे – अकाली जन्मलेल्या व आईकडून बाळाला डेंग्यूची लागण झालेल्या नवजात बाळावर पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले.डॉ. उमेश वैद्य, डॉ. सिद्धार्थ मदभूषी आणि डॉ. अनुषा राव अशा नवजात शिशु तज्ज्ञांची टिमने या बाळावर यशस्वी उपचार केले. पेरीनेटल ट्रान्समिशनमुळे डेंग्यूची लागण झालेल्या या महिलेची प्रसूती सी- सेक्शनद्वारे झाली.

 

गरोदरपणात वाढत्या गर्भाला आधार देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीत बदल होतात, ज्यामुळे गरोदर महिलांना डेंग्यूसारख्या संसर्गाचा धोका अधिक असतो. याव्यतिरिक्त, गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल देखील संक्रमित झाल्यावर रोगाच्या तीव्रतेवर परिणाम करू शकतात. त्याचवेळी, गर्भधारणेदरम्यान डेंग्यूच्या संसर्गामुळे आई आणि बाळ दोघांनाही समस्या उद्भवू शकतात

 

जवळपास 1 ते 5 टक्के डेंग्युचा संसर्ग हा आईकडून बाळाकडे पसरतो. हे गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते, परंतु बाळाला जन्म देण्यापुर्वीच आईला संसर्ग झाल्यास असे होण्याची शक्यता अधिक असते. गरोदरपणात डेंग्यूचा संसर्ग झाल्यास आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

 

आईला डेंग्यूची लागण झाली तर ती न जन्मलेल्या बाळाला देखील संसर्ग देऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, लहान बाळांमध्ये मृत जन्म, अकाली जन्म किंवा इतर आरोग्यविषयक गुंतागुंत देखील होऊ शकतात. नवजात मुलांमध्ये सामान्यतः जन्माच्या 14 दिवसांत (सामान्यतः पहिल्या आठवड्यात) लक्षणे दिसतात, परंतु बहुतेक बाळांमध्ये लक्षणे नसतात. गरोदर मातांची प्रतिकारशक्तीही कमी असू शकते, त्यामुळे त्यांना संसर्ग आणि रोग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून, रोगांपासून सुरक्षित राहणे फार महत्वाचे आहे. ज्या ठिकाणी संसर्गाचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी प्रवास करणे देखील टाळावे.

 

विश्रांतवाडी, पुणे येथे राहणाऱ्या रुग्ण ३३ वर्षीय श्रीमती अवंतिका पाटील (नाव बदलले आहे)* या एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. पहिल्यांदा आई होणार असल्याने त्या व त्यांचे कुटुंबियाना अतिशय आनंद झाला होता. दुर्दैवाने गर्भधारणेदरम्यान तिला सांधेदुखी, ताप आणि डिहायड्रेशन यासारखी लक्षणे होती. 29 जुलै रोजी गर्भधारणेच्या 36व्या आठवड्यांत तिला अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते जेथे आई आणि बाळाला वाचवण्यासाठी त्वरीत सी-सेक्शन करण्यात आले.

 

डॉ. सिद्धार्थ मदभूषी(नवजात शिशू तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल, पुणे) सांगतात की, 36 व्या आठवड्यात या महिलेने 2.33 किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. प्रसूतीच्या ३ दिवस आधी आईला तापाची समस्या होती. माता डेंग्यू पॉझिटिव्ह होती आणि प्लेटलेटची संख्या देखील कमी होती. सुरुवातीला बाळाचे रडणे देखील सामान्य बाळाच्या तुलनेत कमकुवत होते.

 

पेरिनेटल डेंग्यू म्हणजे डेंग्यू विषाणूचा प्रसार आणि काहीवेळा गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीदरम्यान किंवा जन्मानंतर लगेचच आईकडून तिच्या बाळामध्ये डेंग्यू विषाणूच्या ॲंटीबॅाडीज वितरीत होतात. जर एखाद्या आईला गरोदरपणात डेंग्यूची लागण झाली असेल, तर विषाणू आणि अँटीबॉडीज बाळाला संक्रमित करू शकतात. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या अशा दोन्ही वेळेस मातेकडून बाळाला संक्रमण होते, परंतु तिसऱ्या तिमाहीत याची जास्त शक्यता असते. लहान मुलांमध्ये क्लिनिकल प्रेझेंटेशन सौम्य लक्षणांपासून गंभीर डेंग्यूमध्ये शॉक आणि रक्तस्रावी अभिव्यक्तींमध्ये बदलते. पेरिनेटल डेंग्यूची लक्षणे अनुभवणाऱ्या बहुतेक नवजात मुलांमध्ये 5-7 दिवसांच्या अल्प कालावधीत बरे होण्याची चिन्हे दिसून येतात.

 

या बाळाला एनआयसीयूमध्ये हलवण्यात आले आणि त्याला 2 दिवस ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आणि IV सुरू करण्यात आली. बाळाचेया प्लेटलेटच्या संख्येत घट दिसून आली. उपचारांना बाळाचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येऊ लागला व प्लेटलेटच्या संख्येत वाढ होऊ लागली आणि 8 व्या दिवशी 2.45 किलो वजनाच्या बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता आई आणि मूल दोघांचीही तब्येत चांगली असून हे बाळ त्याच्या वयानुसार विकासाचे टप्पे गाठत असल्याची माहिती डॉ. अनुषा राव यांनी दिली.

 

जर बाळाच्या जन्मादरम्यान आईला डेंग्यूची लागण झाली असेल, तर रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरही नवजात बाळाच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आई आणि नवजात शिशू दोघांसाठी पुरेसे हायड्रेशन आणि विश्रांती आवश्यक आहे. जर आई स्तनपान करू शकत असेल, तर तिने ते सुरू ठेवावे. कारण आईचे दूध नवजात बालकांना आवश्यक पोषक तत्वे पुरवते जे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. स्तनपानापुर्वी हात स्वच्छ धुवावेत. गर्भधारणेदरम्यान डेंग्यूच्या उपचारासाठी कोणतीही विशिष्ट लस किंवा औषध नाही. गर्भवती महिलांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला संसर्ग झाला आहे, तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा अशी माहिती डॉ सिद्धार्थ

यांनी दिली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments