पुणे, दि. २३: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणेच्या अधिकार क्षेत्रातील हद्दीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्र. ९६५ अंतर्गत दिवेघाट ते हडपसर ६ चे प्री कन्स्ट्रक्शन वर्क च्या अंतर्गत रोड क्लिनींग, यूटीलिटी शिफ्टींग या कामास सुरूवात करण्यात येणार असून महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावीत, असे आवाहन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे.
दिवेघाट ते हडपसर या भागात महामार्गालगत व महामार्गाच्या हद्दीमध्ये काही मिळकत धारकांनी अनाधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देवूनही अद्यापही काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेले नाहीत.
सदरची अतिक्रमण ७ दिवसात न काढल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येणार आहे. याकरीता येणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल. विहित मुदतीनंतर अतिक्रमणे काढतांना नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे


