Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाचा महत्वपूर्ण निर्णय ;* *सारथी’ व...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाचा महत्वपूर्ण निर्णय ;* *सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती*

 

 

*सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून*

*शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मंत्रीमंडळाची मंजूरी*

 

*‘सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी मानले*

*उपमुख्यमंत्री तथ वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार*

 

मुंबई, दि. 23 :- ‘सारथी’संस्थेच्या दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि ‘महाज्योती’च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासननिर्णय तात्काळ निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बार्टी’प्रमाणे ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनांही आता नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार असल्याने संबंधीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे त्याबद्दल आभार मानले आहेत.

—-०००००—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments