Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedडाक चौपाल “सरकार आपल्या दारी” उपक्रम उत्साहात संपन्न*

डाक चौपाल “सरकार आपल्या दारी” उपक्रम उत्साहात संपन्न*

 

 

*ठाणे दि.24 (जिमाका) :* डाक विभागाची माहिती जनमानसात पोहोचावी म्हणून ठाणे डाक विभागातर्फे “डाक चौपाल- सरकार आपल्या दारी” हा उपक्रम आज येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी आमदार संजय केळकर, ठाणे पोस्ट ऑफिसचे प्रवर अधीक्षक समीर महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. कैलास पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, दंतचिकित्सक डॉ. अर्चना पवार, अभिनेता विघ्नेश जोशी, होली कॉस कॉन्वेट हायस्कूल च्या कॅटनिन्हा गोडिन्हो, सलाम बालक ट्रस्टचे मिलिंद बिडवाई, सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर तसेच ठाणे पोस्ट विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार श्री. केळकर म्हणाले की, सर्वसामान्य जनमाणसाची सेवा करणारे विभाग म्हणजे एस.टी महामंडळ व पोस्ट ऑफिस. जिथे रस्ता नसेल तिथे एस.टी जाते. जिथे गाव तिथे पोस्टमन पोचतो. या दोन्ही विभागांबद्दल मला नितांत आदर आहे. गावातील लोक पोस्टमनची वाट पाहत असायचे. पोस्टमन ला आजही लोकप्रियता आहे. हा विभाग टिकला पाहिजे. जिथे जिथे शक्य तिथे पोस्ट ऑफिसला जागा उपलब्ध करुन द्यायला हवी. हे कार्यालय गरिबांना सेवा देणारे कार्यालय आहे. हा विभाग विविध योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचत आहे. “डाक चौपाल-सरकार आपल्या दारी” हा अतिशय उपयुक्त उपक्रम आहे. “लाडकी बहीण” योजनेमध्येसुध्दा पोस्ट ऑफिसने खूप उपयुक्त काम केले आहे. लाडकी बहीण योजना ही क्रांतिकारी योजना ठरली आहे. ठाणे जिल्ह्यात 13 लाख महिलांना यातून लाभ मिळाला आहे. पोस्ट विभागाचा यामध्ये मोठा सहभाग आहे. सुकन्या योजनेचा लाभ लोकापर्यंत गेला पाहिजे. लहान मुलींना पाठबळ देणारी ही योजना आहे. योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण केले पाहिजे.

प्रास्ताविक करताना श्री.महाजन म्हणाले की, “डाक चौपाल” हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रम आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना आणि त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी टपाल विभाग देशभरात 5 हजार डाक चौपालाचे आयोजन करीत आहे. हा उपक्रम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू असेल. या चौपालच्या माध्यमातून टपाल विभाग प्रत्येक घरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून एकही घर टपाल खात्याच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही. ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या कामासंदर्भातील सुलभता सुनिक्षित करण्यासाठी डाक चौपाल महत्त्वाची भूमिका आहे.

या दिवशी एका छताखाली जनतेस डाक विभागाच्या तसेच सर्व सरकारी कल्याणकारी योजनांविषयी माहिती मिळेल तसेच या सर्व योजनांचा लाभदेखील घेता येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बँक खाते बाल आधार, आधार मोबाईल लिंकिंग, अपघाती विमा, महिला सन्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, टपाल जीवन विमा, तसेच डाक विभागाची सर्व प्रकारची सेविंग्ज खाती या सर्व सेवा आणि योजनांचा समावेश असेल. भारतीय डाक विभागाच्या योजना आणि नागरिक केंद्रित सुविधांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे डाक विभाग सर्वतोपरी सज्ज आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी पोस्ट विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम 30 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

यावेळी विघ्नेश जोशी, ईश्वर सूर्यवंशी, डॉ. कैलाश पवार, महेंद्र गायकवाड आणि मनोज सानप या सर्वांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती अमिता सिंग यांनी केले.

0000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments