नवीन निसान मॅग्नाइट ५.९९ लाख इतक्या किंमतीत झाली लॉन्च. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा. अधिक ठळक डिझाइन आणि कलात्मक रचना.
· नवीन निसान मॅग्नाइट अंर्तबाह्य बदलली आहे तसंच बोल्ड स्वरुपात समोर आली आहे. भारतात लॉन्च झालेल्या या गाडीत २० पेक्षा अधिक फीचर्स पहिल्यांदाच कंपनीने आणले आहेत.
· या नवीन गाडीची निर्मिती चेन्नई मधील अलायन्स प्लँटमध्ये झाली आहे. ही गाडी आता ६५ पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहे. त्यामुळे भारत हा निसानच्या उत्पादनाचं मुख्य केंद्र आहे ही बाब आणखी अधोरेखित होणार आहे.
· मॅग्नाइटमध्ये असलेली हनीकोम्ब जाळीची पुन्हा नव्याने रचना करण्यात आली असून ती लक्ष वेधून घेते. तसंच ग्राऊंड क्लिअरन्स चांगला असल्यामुळे ती आणखी उठून दिसते. या कारच्या आत असलेल्या लेदरसदृश्य फिनिशिंग मुळे आणखी दर्जेदार दिसत आहे.
· नवीन मॅग्नाइटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक फीचर्स आणण्यात आले आहेत. त्यात रिमोट इंजिन स्टार्ट, निसान अराऊंड व्ह्यू मॉनिटर (AVM), फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, तसंच अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले या फीचर्सचासुद्धा समावेश आहे.
· जागतिक दर्जाच्या गाड्यांची बरोबरी करण्यासाठी निसानमध्ये सुरक्षेचे आणखी फीचर्स आणण्यात आले आहेत. ४० पेक्षा अधिक फीचर्समध्ये सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम आणि हायड़्रॉलिक ब्रेक असिस्ट यांचा समावेश आहे.
· सध्या ही गाडी १८ व्हेरिएंटसह १.०ली पेट्रोल एमटी आणि इझेड शिफ्ट तसंच १.०ली टर्बो पेट्रोल एमटी आणि सीव्हीटी या ४ पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे
नवी दिल्ली ४ ऑक्टोबर २०२४- निसान मोटर इंडियाने बोल्ड, वाढीव सुरक्षा आणि प्रगत तंत्रज्ञानासह निसान मॅग्नाइट आज लॉन्च केली आहे. मॅग्नाइटचा बोल्ड लूक अधिक मजबूत बाह्य भागामुळे वाढला आहे. या फीचर्समुळे आत्मविश्वास वाढतो आणि आधीपासूनच रस्त्यावर असलेली उपस्थिती आणखी प्रभावी होते. नावीन्य आणि ग्राहक-केंद्रित रचनेच्या बाबतीच आपली वचनबद्धता कायम ठेवत न्यू मॅग्नाइट आज बाजारात दाखल झाली असून त्याची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये आहे. मॅग्नाइट ही निसानच्या ‘मेक-इन-इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ व्हीजनचं द्योतक आहे. डिसेंबर २०२० मध्ये बाजारात प्रवेश केल्यापासून आतापर्यंत १५०,००० पेक्षा अधिक युनिट्सच्या एकूण विक्रीला मागे टाकलं आहे आणि भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोरदार प्रभाव पाडला आहे.
नवीन निसान मॅग्नाइटचं बाजारात येणं हे ब्रँडच्या निर्यात बाजारपेठेचा विस्तार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ‘मेड इन इंडिया’ मॅग्नाइटला सतत मागणी आहे आणि तिची लोकप्रियता वाढली आहे. यामुळे कंपनीला ४७ नवीन बाजारपेठांमध्ये आपली निर्यातीचा विस्तार करण्याची परवानगी मिळाली आहे. लेफ्ट-हँड ड्राइव्ह असलेल्या बाजारपेठांसह आता ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ही गाडी निर्यात होते.
निसानची निर्यात आता ६५ पेक्षा अधिक देशांमध्ये होते . एएमआयईओ रिजन बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनचे विभागीय उपाध्यक्ष आणि निसान इंडिया ऑपरेशन्सचे अध्यक्ष फ्रँक टोरेस म्हणतात, “आमच्या जागतिक धोरणात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि आमच्या चेन्नई प्रकल्पातून मॅग्नाइट जगभरातील अधिक बाजारपेठांमध्ये सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आमच्या निर्यातीच्या लक्ष्याला मजबुती मिळतेच त्याचबरोबर आमच्या ग्राहक-प्रथम तत्त्वज्ञानाला आणखी बळकटी मिळते. निसान मॅग्नाइट २०२० मध्ये भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यापासून मिळालेले यश हे आमच्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ तत्त्वज्ञानाचे शाश्वत मूल्य दाखवते.”
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयपीएल) चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “मॅग्नाइटने बाजारपेठेच्या अपेक्षांची नव्याने व्याख्या केली आहे, ग्राहकांची अढळ निष्ठा मिळवली आहे आणि या सेगमेंटमध्ये नवीन मानकं स्थापित केली आहेत. नवी मॅग्नाइट सुरक्षा, प्रीमियम फीचर्स, शक्तिशाली पण कार्यक्षम सीव्हीटी टर्बो पॉवरट्रेनसह सर्व आघाड्यांवर मूल्य देते. या लॉन्चमुळे उत्कृष्टतेप्रति असलेली आमची अढळ बांधिलकी दर्शवते आणि देशात आपलं उत्पादन आघाडीवर रहावं या आमच्या दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारतातील ग्राहकांनी दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत आणि मॅग्नाइटला देशात यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. निसान मॅग्नाइट देखील आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्याही पसंतीस पडेल असा आम्हाला विश्वास आहे.
बोल्ड अपीलसह मॉडर्न आणि डायनॅमिक डिझाइन
आपल्या मागील यशाच्या आधारे, न्यू निसान मॅग्नाइट कठोर, बोल्ड आणि अधिक मजबूत बाह्य भागामुळे ‘मॅग्नाइटनेस’ अधिक ठळकपणे दिसतो. त्यामुळे निसानची रस्त्यावरची उपस्थिती अधिक प्रकर्षाने जाणवते. मॅग्नाइटमध्ये लाइटसेबर स्टाइल टर्न इंडिकेटरसह स्लीक एलइडी हेडलॅम्प्स, थ्रीडी ग्रेडिएंट “हनीकॉम्ब” पॅटर्नसह बेस्ट-इन-क्लास एलइडी टेललॅम्प्स आणि मॅग्नाइटचे सिग्नेचर एल-शेप डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) आहेत.
याव्यतिरिक्त, नवीन मॉडेलमध्ये समोर नवीन फ्लोटिंग अपलिफ्ट स्किड प्लेट, मोठी आणि बोल्ड नवीन आकर्षक ग्रिल, सर्व नवीन ड्युअल टोन आर १६ डायमंड कट अलॉय व्हील, फंक्शनल रूफ रेल (५० किलो क्षमता) आणि सर्वोत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलं आहे. यामुळे गाडीची वैविध्यपूर्ण रचना नजरेस भरते.
सर्व आवडीनिवडी आणि ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, नवीन निसान मॅग्नाइट ११ बॉडी कलर, ६ मोनोटोन आणि ५ ड्युअल-टोन मध्ये उपलब्ध आहे. सर्व ग्राहकांच्या आवडीनुसार आणि त्यांची कार त्यांच्याइतकीच अद्वितीय आहे याची खात्री करण्यासाठी कुशलतेने तयार करण्यात आली आहे.
प्रीमियम आणि आलिशान इंटिरिअर
नवीन निसान मॅग्नाइट त्याच्या सुबक इंटिरिअरसह नवीन मानकं प्रस्थापित करते. तसंच विविधांगी रंगांच्या थीम्स आणि अत्याधुनिक फीचर्स या गाडीत पहायला मिळतात. ब्राउनीश ऑरेंज रंगात गुंडाळलेला लेदरसदृश्य डॅशबोर्ड, अनोख्या ‘हनीकोंब’ पद्धतीने गुंफलेल्या सीट्स, लेदरेट ऑल डोअर ट्रिम, पार्किंग ब्रेक लिव्हर, स्टीअरिंग आणि फ्रंट आर्मरेस्टसह युनिक ३६० लेदर पॅक ही वैशिष्ट्ये पहिल्यांदाच या फीचर्समध्ये देण्यात आली आहेत.
नवीन निसान मॅग्नाइटमध्ये केबिन स्टोरेजमध्ये सर्वात मोठी, सुधारित सीट कम्फर्ट, स्टँडर्ड ६०:४० रियर सीट स्प्लिटसह ३३६ एल ते ५४० एल पर्यंत स्टँडर्ड एक्सपांडेबल बूट स्पेस, सर्वात मोठी आणि दुर्मिळ नी रूम, हाय कमांड ड्रायव्हिंग पोझिशन, बेस्ट इन क्लास फ्रंट सीट कपल डिस्टन्स, स्टोरेजसह फ्रंट आर्मरेस्ट आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्सचा समावेश आहे.
प्रगत तंत्रज्ञान
नवीन निसान मॅग्नाइटमध्ये हीट गार्ड टेकसह २० पेक्षा अधिक फीचर्स पहिल्यांदाच या गाडीत बघायला मिळतील. त्यात प्रिमियम क्विल्टेड लेदरेट सीट, मेमरी फंक्शनसह मल्टी कलर एम्बियंट लाइट, प्लाझ्मा क्लस्टर एअर आयनायझर, ६० मीटर रेंजसह रिमोट इंजिन स्टार्टसह नवीन ग्लोबल स्मार्ट की, वॉक अवे लॉक (डब्ल्यूएएल) आणि अप्रोच अनलॉक (एयूएल) फंक्शन, सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक बेजल-लेस ऑटो डिमिंग आयआरव्हीएमसह. एलइडी हेडलॅम्प, एलइडी टेललॅम्प, एलइडी डे टाइम रनिंग लाइट, एलइडी इंडिकेटर आणि एलइडी फ्रंट फॉग लॅम्पसह फुल एलइडी एक्सटीरियर पॅक यांचा समावेश आहे.
नवीन मॉडेलमध्ये अराउंड व्ह्यू मॉनिटर, डार्क थीमसह १७.७८ सेमी पूर्ण डिजिटल प्रगत मल्टी-फंक्शनल क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह फ्लोटिंग २०.३२ सेमी (८) टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एआरकेएएमआयएसद्वारे ३ डी साउंड आणि क्रूझ कंट्रोल देखील आहे. त्यामुळे ज्यामुळे निसान मॅग्नाइट ही सध्याच्या काळातील ग्राहकांचे लाड पुरवण्यासाठी तयार असलेल्या श्रेणीतील सर्वात प्रीमियम कार आहे.
यासोबतच न्यू निसान मॅग्नाइटमध्ये ग्राहकांना डॅशकॅम, वायरलेस चार्जर, प्रीमियम स्पीकर्स (जेबीएल पॉवर्ड हार्मन), पॉडल लॅम्प आणि एलइडी स्कफ प्लेट्स असलेल्या अनोख्या टेक पॅकचा पर्याय देण्यात आला आहे.
दमदार कामगिरी
नवीन निसान मॅग्नाइट स्पोर्टी आणि फन-टू-ड्राइव्ह पॉवरट्रेन ही श्रेणी आहे. त्यामुळे ग्राहकांना रोमांचक ड्रायव्हिंग अनुभव मिळेल. एचआरए ०.१० टर्बो इंजिन हे बाजारातील बी-एसयूव्हीमधील सर्वात इंधन-कार्यक्षम इंजिन (२० किमी प्रति लीटर) आहे, जे कमी वेग असताना उच्चप्रतीचं टॉर्क मिळतं. त्यामुळे गाडी सुरू झाली की उच्चप्रतीच्या ॲक्सिलरेशनचा फील येतो.
एचआरए ० १.०-लीटर मिरर बोर कोटिंग सिलिंडर ब्लॉक तंत्रज्ञानासह येते. हे तंत्रज्ञान निसान जीटी-आर सारख्या जागतिक दर्जाच्या स्पोर्ट्स कारमध्ये वापरली जाते, इंटिग्रेटेड एक्झॉस्ट मॅनिफोल्डसह सिलिंडर हेड, स्प्लिट कूलिंग, फोर्ज्ड क्रॅंक शाफ्ट, इलेक्ट्रिक टर्बो अॅक्च्युएटर्स, कार्यक्षमता आणि इंधन कार्यक्षमता सुधारणे आणि एनव्हीएच आणि उत्सर्जन कमी करणे. एचआरए0 १.० लीटर टर्बो इंजिन ५ स्पीड आणि एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल.
ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हे थर्ड जनरेशन एक्सट्रॉनिक- सीव्हीटी ट्रान्समिशन आहे. त्यामुळे गिअरची विस्तृत श्रेणी मिळते, ज्यामुळे शहरात प्रचंड ट्रॅफिक असलं तरी त्याचा त्रास होत नाही. इंधनाची बचत होते. ट्विन ऑइल पम्प, आणि नवीन इलेक्ट्रिकल ऑइल पम्पमुळे ॲक्सिलरेशनही चांगलं मिळतं. या गाडीत डी-स्टेप लॉजिक कंट्रोल कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा समावेश आहे. गाडीची स्पीड, ॲक्सिलरेटर पेडल पोझिशन आणि स्पीड यासारख्या डायनॅमिक इनपुटचा वापर करून हायवेवर उत्तम ड्रायव्हिंगसाठी आवश्यक आदर्श गिअर रेशो निश्चित करते.
नवीन निसान मॅग्नाइटमध्ये बी ४डी १.०-लीटर देखील आहे. ते मॅन्युअल किंवा ईझेड-शिफ्ट (एएमटी) पर्यायासह नॅचरली अस्पायरेटेड इंजिन आहे.
निसानचे सुरक्षा कवच
निसानसाठी सुरक्षा सर्वोपरी असल्याने, न्यू मॅग्नाइटने चाळीसपेक्षा अधिक स्टँडर्ड अक्टिव्ह सुरक्षा वैशिष्ट्यं आणि ५५ पेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्यं या गाडीत आणली आहेत. या गाडीत ६ एअरबॅग्ज (२ फ्रंट एअरबॅग्ज/२ साइड एअरबॅग्ज/ २ कर्टेन एअरबॅग), व्हेइकल डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल स्टार्ट असिस्ट (एचएएस), हायड्रोलिक ब्रेक असिस्ट (एचबीए), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त, ग्राहक सर्व सीटसाठी ३ पॉईंट सीट-बेल्ट, सर्व सीटसाठी सीट-बेल्ट रिमाइंडर, चाइल्ड लॉक, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकोरेज आणि रियर पार्किंग सेन्सर यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे ड्रायव्हिंगचा आनंद मिळेल. तसंच या फीचर्समुळे प्रवास फक्त आरामदायी नाहीतर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असेल.
या सुरक्षेच्या उपाययोजनेबरोबर ६७ टक्के उच्च तन्यता असलेल्या स्टीलची बॉडी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ३ वर्ष किंवा १ लाख किलोमीटर इतकी वॉरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या निर्धोकपणे गाडी चालवू शकतात.
नवीन मॅग्नाइट अपेक्षांची पूर्तता करतेच पण त्याचबरोबर रस्त्यावर अतिशय दणकट आणि अत्याधुनिक गाडी चालवत असल्याचा फील देते. तेसुद्धा अतिशय किफायतशीर दरात. हे सर्व बदल घडवल्यामुळे निसान अतिशय उत्तम किमतीत गाडी उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता अधोरेखित करते. त्यामुळे प्रत्येक बाबतीत वेगळी गाडी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही गाडी उत्तम पर्याय आहे.
न्यू मॅग्नाइटचं लॉन्च आणि डाव्या हाताच्या ड्राइव्हमुळे अतिरिक्त बाजारपेठांमध्ये विस्तार यामुळे भारत हे निसानचं एक मोठं ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून असलेलं स्थान अधोरेखित करते. कार्यक्षम स्थानिक उत्पादनासह जपानी डिझाइनची सांगड घालत, मॅग्नाइट जगभरातील ग्राहकांना उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि प्रभावी कामगिरी देते.
चेन्नईतील अत्याधुनिक निसान-रेनो अलायन्स प्लांट हे निसानच्या भारतीय बाजारपेठेशी असलेल्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. भारतातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या भागात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी निसानने नावीन्यपूर्णतेवरचं लक्ष अबाधित ठेवलं आहे. ही भूमिका आणि बाजारपेठ हे निसानसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या उत्पादनांची रेंज अधिकाधिक चांगली करणे हे निसानच्या जागतिक व्यापारात आपलं स्थान सुनिश्चित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच महत्त्वाच्या बाजारपेठेत अत्याधुनिक विद्युतीकरण, इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी नवीन भूमिका, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी योग्य भागीदारी करणे हेही निसानचे उद्दिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी: https://www.one.nissan.in/book-a-car या वेबसाइटला भेट द्या.


