Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझी अभिजात मराठी स्वाक्षरी' उपक्रमाद्वारे आनंदोत्सव मनसे कसबा विभाग तर्फे आयोजन...

माझी अभिजात मराठी स्वाक्षरी’ उपक्रमाद्वारे आनंदोत्सव मनसे कसबा विभाग तर्फे आयोजन ; तब्बल २१०० पेढयांचे वाटप

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कसबा विभाग, पुणे शहर तर्फे ‘माझी अभिजात मराठी स्वाक्षरी’ हा उपक्रम शनिपार चौकात राबविण्यात आला. केंद्र सरकार कडून मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ घोषित केल्याबद्दल तब्बल २१०० पेढयांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

असंख्य मराठी प्रेमींची अनेक वर्षे मराठी भाषेस अभिजात दर्जा द्यावा ही मागणी होती. ती मागणी पूर्ण झाल्याबद्दल हा आनंदोत्सव पुणेकरांनी साजरा झाला. यावेळी चितळे बंधू मिठाईवाले संचालक श्रीकृष्ण चितळे, मनसे सरचिटणीस ॲड. गणेश सातपुते, रणजीत शिरोळे, उपाध्यक्ष आशिष देवधर, कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे, आशिष साबळे, नरेंद्र तांबोळी, प्रल्हाद गवळी, निलेश हांडे, सुरेखा होले, आशुतोष माने, आयोजक वसंत खुटवड, रवि सहाणे, सारंग सराफ आदी उपस्थित होते. नितीन रजपूत, चंद्रकांत राजगुरु यांनी उपक्रमाला सहकार्य केले.

 

आयोजक रवि सहाणे आणि सारंग सराफ म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मराठी भाषा दिनी मराठी स्वाक्षरी उपक्रम आम्ही राबवत आहोत. मात्र, आता मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ घोषित झाल्याने सर्वच मराठी जनतेत आनंदाची लहर आली आहे आणि हाच आनंदोत्सव साजरा करण्या साठी मनसे कसबा विभाग तर्फे ” माझी अभिजात मराठी स्वाक्षरी” हा उपक्रम राबवून नागरिकांना मराठी स्वाक्षरी करण्यास आवाहन केले व सर्वांना पेढे ही वाटले. या उपक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तीन तासात असंख्य नागरिकांनी अभिमानाने अभिजात मराठी स्वाक्षरी केली व या सर्व २१०० नागरिकांना पेढेही वाटले .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments