Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा हिताची ची अधिकृत डीलरशिप असलेल्या इंडियन कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे...

टाटा हिताची ची अधिकृत डीलरशिप असलेल्या इंडियन कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यात नवीन इंटिग्रेटेड फॅसिलिटीचे उद्घाटन

पुणे, ९ ऑक्टोबर २०२४ : टाटा हिताची ची अधिकृत डीलरशिप असलेल्या इंडियन कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड ने पुणे आणि अहमदनगर या दोन्ही बाजारपेठांमधील ग्राहकांची पूर्तता करण्यासाठी पुण्यात विक्री, सेवा, सुटे भाग आणि मशीन केअरसाठी एक अत्याधुनिक इंटिग्रेटेड फॅसिलिटी सुरु केली आहे.

या अद्ययावत इंटिग्रेटेड फॅसिलिटीचे उदघाटन करताना टाटा हिताचीचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सिंग म्हणाले की, ही सुविधा ग्राहकांसाठी विक्री, सेवा आणि सुटे भागांसह एकाच छताखाली सर्वकांश सेवा प्रदान करेल. या धोरणात्मक विस्ताराचे उद्दिष्ट टाटा हिताचीची या भागात उपस्थिती आणि सेवा क्षमता अधिक बळकट करणे हे आहे.

ते पुढे म्हणाले की, आमच्या ग्राहकांना वेळेवर, गुणवत्तापूर्ण सेवा आणि सुटे भाग मिळतील याची खात्री करण्यासाठी टाटा हिताची वचनबद्ध आहे.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील ग्राहकांना सेवा देत असलेले इंडियन कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड हे 2022 पासून टाटा हिताचीचे विश्वसनीय भागीदार आहे.

लोणी कंद, पुणे येथे नव्याने सुरु करण्यात आलेली ही सुविधा स्ट्रक्चरल वेल्डिंग, इंजिन दुरुस्ती आणि हायड्रोलिक मेंटेनन्ससह संपूर्ण मशीन ओव्हरहॉल सारख्या सेवा प्रदान करण्यासाठी सुसज्ज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments