पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ म्हणाले की, दसरा हा दागिने खरेदीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस असतो व यावर्षी दसरा वीकेंडला येत असल्याने चांगल्या मागणीची अपेक्षा आहे.जरी नुकतेच सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली असली तरी एकंदर वातावरण खरेदीच्या दृष्टीने सकारात्मक आहे.सोन्याकडे ग्राहक हे चांगली गुंतवणूक म्हणून बघत असून सध्याच्या सोन्याच्या दराच्या पातळीमुळे खरेदीवर परिणाम होणार नाही. सर्व श्रेणींमध्ये दमदार विक्री आम्ही पाहत आहोत.विशेष करून वर्षभर हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठी मागणी असून ही कायम राहिली आहे.दसऱ्याला ही मागणी आणखी वाढेल.प्लॅटिनम आणि चांदीच्या दागिन्यांना देखील मागणी असून दिवाळीनिमित्त चांदीचे दागिने व वस्तूंना मोठी मागणी आहे. नवरात्रीमध्ये नऊ नवीन दालने आम्ही सुरू केली असून याला चांगला प्रतिसाद मिळाला असून बाजारपेठेतील सकारात्मक वातावरण प्रतिबिंबित होते. उद्योगांमधील तज्ञांनुसार देखील दसरा आणि दिवाळी या उत्सवकाळात दमदार विक्रीची अपेक्षा आहे.
दागिने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल – सौरभ गाडगीळ
RELATED ARTICLES


