Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविनय कॉर्पोरेशन लिमिटेड’तर्फे ‘सेबी’कडे ‘आयपीओ’साठी डीआरएचपी दाखल

विनय कॉर्पोरेशन लिमिटेड’तर्फे ‘सेबी’कडे ‘आयपीओ’साठी डीआरएचपी दाखल

विनय कॉर्पोरेशन लि. ही कंपनी दुचाकी, तिचाकी वाहनांच्या, तसेच प्रवासी व व्यावसायिक वाहनांच्या सुट्या भागांचे डिझाइन व उत्पादन करते; तसेच देशात व परदेशांतही या उत्पादनांचा पुरवठा करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये स्टीयरिंग व्हील स्विचेस, गियर शिफ्टिंग पॅडल्स, लाइट कंट्रोल युनिट्स, ब्रेक पेडल स्विचेस व सेन्सर्स, मल्टीमीडिया प्लग आणि एअरबॅग ऑन / ऑफ स्विचेस (दृश्यमान किंवा झाकलेले स्विच) अशा मेकॅट्रॉनिक उत्पादनांचा; तसेच वायरिंग हार्नेस, फ्यूज बॉक्स, वायर, केबल्स, टर्मिनल आणि कनेक्टर अशा कनेक्टिव्ह उत्पादनांचा समावेश आहे.

‘विनय कॉर्पोरेशन’ने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीएचआरपी) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या बाजार नियामक संस्थेकडे दाखल केला आहे. या प्राथमिक समभाग विक्रीच्या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले व एकुणात 150 कोटी रुपयांची किंमत असलेले ‘फ्रेश इश्शू’मधील इक्विटी शेअर्स आणि कंपनीच्या शेअरहोल्डर्सकडे असलेले ऑफर फॉर सेलसाठी उपलब्ध असलेले 22,213,852 इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.

‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’द्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. (सूचीचे तपशील)

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments