Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुस्वरांनी रंगली राहुल देशपांडे यांची संगीत संध्या देशप्रेमी मित्र मंडळातर्फे राहुल देशपांडे...

सुस्वरांनी रंगली राहुल देशपांडे यांची संगीत संध्या देशप्रेमी मित्र मंडळातर्फे राहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्टचे आयोजन

पुणे : विविध रागांनी सजलेले सूर, तबल्याची अप्रतिम साथ आणि कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाला रसिकांची मनमुराद दाद अशा संगीत आणि सुरांच्या मिलापाने गायक राहुल देशपांडे यांची संगीत मैफल रंगली.

देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने कोथरूड मधील गांधी लॉन्स येथे राहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन करण्यात आले होते. सूर, ताल आणि लय यांनी नटलेल्या या मैफिलीमध्ये रसिकांनी राहुल देशपांडे यांच्या गायकीचा मनमुराद आनंद लुटला. निखिल पाठक, विशाल धुमाळ आणि प्रसाद जोशी यांनी राहुल देशपांडे यांच्या मैफिलीला साथ संगत केली. मंदार बलकवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोलवूड वेंचर्स आणि मॅजेस्टिक लँडमार्क यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहकार्य केले.

पुरिया धनश्री रागातील ‘पायलिया झंकार बाजे’ या गाण्याने राहुल देशपांडे यांनी आपल्या मैफिलीला सुरुवात केली. ‘पिया समझावत, समझत नाही पायलिया मोरे’ या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली बिंदिया ले गयी हमारी रे मछलिया जाये काही कोई मोरे छोटे देवर’ से या ठुमरी ने राहुल देशपांडे यांनी रसिकांची मने जिंकली. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात भेट आपली का स्मरशी काय तो मनात’ या पंडित वसंतराव देशपांडे यांच्या अप्रतिम गाण्याचे सादरीकरण करून राहुल देशपांडे यांनी रसिकांना आपल्या सुमधुर स्वरांनी जिंकले.

राहुल देशपांडे म्हणाले, कोथरूड मधील या भागामध्ये मी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सांघिक कार्यक्रमाचे आणि तेही शास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन झालेले पाहत आहे. मंदार बलकवडे यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत काटेकोरपणे आयोजन करून त्यांनी त्यांची संगीताविषयी आणि कलाकारांविषयी असलेले प्रेम दाखवून दिले आहे. शास्त्रीय संगीत लोकांच्या घराघरापर्यंत आणि विशेषता तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. आदिती द्रविड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments