पुणे, 18 ऑक्टोबर 2024 – डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित नहुश जाधव पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत 10 संघानी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा दि.21 ते 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीत डेक्कन जिमखानाच्या मैदानावर होणार आहे.
डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस मिहीर केळकर यांनी सांगितले की, या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले आहेत. एकूण 175 खेळाडूंच्या सहभागातून घेण्यात आलेल्या लिलावात प्रसाद जाधव(4600पॉइंट्स, ए अँड ए शार्क्स) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या शिवाय पराग चितळे(3000पॉईंट्स, ऍक्वा रायडर्स), देवेंद्र चितळे (3000पॉईंट्स,सिटी प्राईड सुपर स्टार्स) यांचा समावेश आहे.
विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखाना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला नहुश जाधव यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.द नेचर मुकाईवाडी, कोटक बँक, पिनॅकल ग्रुप आणि लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत आयकॉन टायगर्स, स्नो लेपर्डस, सिटी प्राईड सुपर स्टार्स, प्रसन्ना हिरोज, रायनोज, वुल्व्हस, ऍक्वा रायडर्स, वाडेश्वर विझार्डस, ए अँड ए शार्क्स, पँथर्स हे दहा संघ झुंजणार आहेत.
स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेचे सामने प्रत्येकी 7 षटकांचे असणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना दि.26 ऑक्टोबर 2024 या दिवशी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.स्पर्धेचे उदघाटन अनंत रानडे, नहूश जाधव आणि सुशीलकुमार देशमुख यांच्या हस्ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विश्र्वेश कटक्कर यांचा समावेश आहे.


