Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी येथील डाॅ.हेडगेवार भवन येथे २०६,पिंपरी विधानसभा (अ.जा.)...

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी येथील डाॅ.हेडगेवार भवन येथे २०६,पिंपरी विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाचे कार्यालय स्थापन

आज पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष, आम आदमी पार्टी, शिवशाही व्यापारी संघ, भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी व राष्ट्रीय बाल्मिकी सेना राष्ट्रीय संयुक्त आघाडी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, नायब तहसीलदार अभिजित केंद्रेकर, मीडिया समन्वयक विजय भोजने,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
यावेळी निवडणूक विषयक सर्व बाबीची, मतदार संघाची माहिती देणेत आली.

यानंतर पत्रकार परिषद देखील घेणेत आली, त्यामध्ये उपस्थित पत्रकार यांना निवडणूक विषयक माहिती देणेत आली. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी त्यांच्याशी संवाद साधला तसेच मतदारसंघात मतदारांना देण्यात येणा-या सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments