गुरूग्राम, ऑक्टोबर १८, २०२४ – सॅमसंग इंडियाचा प्रमुख सीएसआर उपक्रम सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसने ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध युनिव्हर्सिटीच्या ४०० विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कोर्सचे समापन केले, ज्यामधून देशातील प्रबळ सहयोगी असण्याची ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. तसेच कंपनी सरकारसोबत देशातील तरूणांना कुशल करण्याप्रती आणि #DigitalIndia ला सक्षम करण्याप्रती त्यांच्या मिशनसोबत काम करत आहे.
सत्कार समारोहामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणित करण्यात आले. या सत्कार समारोहामध्ये गौतम बुद्ध युनिव्हर्सिटीचे उप कुलगुरू प्रो. आर. के. सिन्हा, तसेच सॅमसंग आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय)चे अधिकारी उपस्थित होते.
एक वर्षानंतर संपूर्ण उपक्रम समाप्त झाल्यावर प्रत्येक डोमेनमधील टॉपर्सना १ लाख रूपयांचे रोख पारितोषिक मिळेल, तसेच दिल्ली/एनसीआरमधील सॅमसंगच्या सुविधांना भेट देण्याची संधी मिळेल. या भेटींदरम्यान त्यांना सॅमसंगच्या लीडरशीप टीमसोबत संवाद साधण्याची संधी मिळेल. फक्त एवढेच नाही, राष्ट्रीय कोर्स टॉपर्सना आकर्षक सॅमसंग उत्पादने मिळतील.
”देशातील तरूणांना एआय, आयओटी, बिग डेटा आणि कोडिंग अशा फ्यूचर-टेक कौशल्यांचे शिक्षण देणे देशाच्या विकासगाथेप्रती योगदान देण्याच्या आणि डिजिटल भारत उपक्रमाला चालना देण्याच्या सॅमसंगच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. सॅमसंगचा प्रमुख सीएसआर उपक्रम सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसच्या दुसऱ्या सीझनने त्यादिशेने पाऊल उचलले आहे, जेथे देशभरातील तरूणांना त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी बहुमूल्य ज्ञान व प्रशिक्षण दिले जाईल,” असे सॅमसंग साऊथ वेस्ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष एसपी चुन म्हणाले.
सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस एआय, आयओटी, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग या चार प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सखोल प्रशिक्षण देते. विद्यार्थ्यांना कॅपस्टोन प्रकल्प आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळतो, ज्यामागे त्यांच्या रोजगारक्षमतेला चालना देण्याचा मनसुबा आहे. एआय कोर्सची निवड करणाऱ्या सहभागींना २७० तासांचे सैद्धांतिक प्रशिक्षण मिळते, तसेच त्यांना ८० तासांचे प्रकल्प कार्य पूर्ण करावे लागते. दरम्यान, आयओटी किंवा बिग डेटा कोर्सेसची निवड करणाऱ्या सहभागींना १६० तासांचे सैद्धांतिक प्रशिक्षण मिळते, तसेच त्यांना ८० तासांचे प्रकल्प कार्य पूर्ण करावे लागते. कोडिंग अँड प्रोग्रामिंग कोर्समधील सहभागी ८० तासांचे प्रशिक्षण घेण्यासोबत हॅकेथॉन इव्हेण्टमध्ये सहभाग घेतील. सॅमसंग या उपक्रमाचा भाग म्हणून संपूर्ण भारतातील ३,५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देईल.
या उपक्रमामध्ये चार राज्यांमधील आठ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. उत्तरेकडील प्रांतामध्ये लखनौ व गोरखपूर येथे प्रशिक्षण केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत, तसेच दिल्ली एनसीआर येथे दोन प्रशिक्षण केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. दक्षिणेकडील प्रांतामध्ये तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांना कव्हर करत प्रशिक्षण केंद्रे चेन्नई व श्रीपेरंबुदुर येथे स्थापित करण्यात आली आहेत, तसेच बेंगळुरूमध्ये दोन प्रशिक्षण केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत.
या उपक्रमादरम्यान सहभागींना मान्यताप्राप्त प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणि देशरातील ईएसएससीआयच्या शिक्षण सहयोगींकडून मार्गदर्शन-केंद्रित मिश्रित क्लासरूम व ऑनलाइन प्रशिक्षण मिळेल. या उपक्रमासाठी नोंदणी केलेल्या तरूणांना क्लासरूम व ऑनलाइन प्रशिक्षण मिळेल आणि ते एआय, आयओटी, बिग डेटा व कोडिंग अँड प्रोग्रामिंग यामधील त्यांच्या निवडक तंत्रज्ञान क्षेत्रांमधील प्रत्यक्ष कॅपस्टोन प्रकल्प कार्य पूर्ण करू शकतील.
त्यांना त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण देखील देण्यात येईल. सहभागींना भारतभरातील ईएसएससीआयचे प्रशिक्षण व शिक्षण सहयोगींच्या माध्यमातून प्रेरित करण्यात येईल. या दृष्टिकोनामध्ये ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षण, सर्वोत्तम हॅकेथॉन्स व कॅपस्टोन प्रकल्प, तसेच सॅमसंग कर्मचाऱ्यांकडून प्रदान करण्यात येणारे तज्ञ मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
२०२३ दरम्यान, सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसने ३००० विद्यार्थ्यांना फ्यूचर-टेक कोर्सेसमध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षित केले. या उपक्रमामध्ये सॅमसंगच्या सहभागामधून भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अॅक्टिव्हिटीजच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते. या उपक्रमाला पूरक सॅमसंगचे इतर सीएसआर उपक्रम देखील आहेत, जसे सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो. या उपक्रमांच्या माध्यमातून सॅमसंगचा भारतातील भावी लीडर्सना अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देण्याकरिता आवश्यक शिक्षण व कौशल्ये प्रदान करत सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
एसएनआय लिंक: https://news.samsung.com/in/400-students-of-samsung-innovation-campus-certified-in-future-tech-skills-at-gautam-buddha-university


