Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून व्यावसायिक वाहन ग्राहकांसाठी अद्वितीय सहभागात्‍मक उपक्रम 'कस्‍टमर केअर महोत्‍सव' लाँच

टाटा मोटर्सकडून व्यावसायिक वाहन ग्राहकांसाठी अद्वितीय सहभागात्‍मक उपक्रम ‘कस्‍टमर केअर महोत्‍सव’ लाँच

मुंबई, १३ जानेवारी २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने व्‍यावसायिक वाहन ग्राहकांसाठी सर्वसमावेशक ग्राहक सहभाग उपक्रम ‘कस्‍टमर केअर महोत्‍सवा’ची घोषणा केली आहे. १४ जानेवारी ते ३० मार्च २०२४ पर्यंत आयोजित करण्‍यात आलेला हा उपक्रम देशभरातील सर्व अधिकृत टाटा मोटर्स सर्विस आऊटलेट्समध्‍ये राबवण्‍यात येईल. कस्‍टमर केअर महोत्‍सव ताफा मालक आणि ट्रक ड्रायव्‍हर्सशी संलग्‍न होत त्‍यांच्‍या गरजा व उदयोन्‍मुख ट्रेण्‍ड्स जाणून घेण्‍यासाठी उत्तम व्‍यासपीठ म्‍हणून सेवा देईल. तसेच हा उपक्रम ग्राहकांना अनेक फायदे देखील देईल, जसे प्रशिक्षित टेक्निशियन्‍सकडून वाहनाची सविस्‍तर तपासणी, टाटा जेन्‍यूएन पार्ट्सच्‍या निवडक श्रेणीवर आकर्षक सूट आणि मूल्‍यवर्धित सेवा जसे अॅन्‍युअल मेन्‍टेनन्‍स कॉन्‍ट्रॅक्‍ट (एएमसी), फ्लीट मॅनेजमेंट सोल्‍यूशन्‍स (एफएमएस) व फ्लीट एज. ड्रायव्‍हर्सना सुरक्षित व इंधन बचत करणाऱ्या ड्रायव्हिंग पद्धतींबाबत सर्वसमावेशक प्रशिक्षण, आरोग्‍य तपासणी, हायजिन किट्स आणि संपूर्ण सेवा २.० उपक्रमांतर्गत विशेषत: त्‍यांच्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले मूल्‍य तत्त्व यांचा फायदा मिळेल.

 

या विशिष्‍ट उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, ”टाटा मोटर्समध्ये आमच्‍या व्‍यवसायाच्‍या प्रत्‍येक पैलूमध्‍ये ग्राहक-केंद्रित्वाला प्राधान्‍य दिले जाते. आमच्‍या ऑफरिंग्‍ज व सर्विसेसना ग्राहकांचे उत्तम अभिप्राय मिळाले आहेत, ज्‍यामधून ग्राहकांना परिपूर्ण समाधानाची खात्री मिळते. हा महोत्‍सव आमच्‍या संपन्‍न व वैविध्‍यपूर्ण सर्विस ऑफरिंग्‍ज दाखवण्‍यासाठी, योग्‍य वाहन व ड्रायव्‍हर आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी, तसेच ग्राहक व इतर भागधारकांसोबतचे आमचे संबंध दृढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. संपूर्ण देशभरात राबवण्‍यात येणारा हा महोत्‍सव सर्व व्‍यावसायिक वाहन वर्कशॉप्‍समध्‍ये राबवण्‍यात येईल, तसेच ट्रक्‍स, बसेस् व व्‍हॅन्‍स आणि लहान ट्रक्‍स अशा प्रत्‍येक प्रॉडक्‍ट लाइनला कव्‍हर करण्‍यात येईल. हा महोत्‍सव ग्राहकांसाठी अत्‍यंत लाभदायी व मूल्‍यवर्धित करण्‍याप्रती आम्‍ही कटिबद्ध आहोत. आम्‍ही सर्व ग्राहकांना व ड्रायव्‍हर्सना या उपक्रमामध्‍ये सक्रियपणे सहभाग घेण्‍याचे आणि आम्‍ही बारकाईने डिझाइन केलेल्‍या टाटा मोटर्सच्‍या ऑफरिंग्‍जच्‍या सर्वसमावेशक श्रेणीचा व्‍यक्तिश: अनुभव घेण्‍याचे आवाहन करतो.”

 

दर्जात्‍मक वाहनांसह कंपनी विनासायास वाहन जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासाठी मूल्‍यवर्धित सेवा देखील देईल. टाटा मोटर्सचे संपूर्ण सेवा २.० सर्वसमावेशक केअर पॅकेज प्रदान करते, जे वाहनाच्‍या खरेदीसह सुरू होते आणि वाहनाच्‍या जीवनचक्रादरम्‍यान कार्यसंचालनांच्‍या प्रत्‍येक पैलूला पाठिंबा देते. या सर्वसमावेशक सोल्‍यूशनमध्‍ये ब्रेकडाऊन असिस्‍टण्‍स, हमीपूर्ण टर्नअराऊंड टाइम, अॅन्‍युअल मेन्‍टेनन्‍स कॉन्‍ट्रॅक्‍ट्स (एएमसी), जेन्‍यूएन स्‍पेअर पार्ट्सची सोईस्‍कर उपलब्धता आणि अतिरिक्‍त उद्योग-अग्रणी सर्विसेस् यांचा समावेश आहे. टाटा मोटर्स डेटा विश्‍लेषणाचे पाठबळ असलेले कनेक्‍टेड वेईकल व्‍यासपीठ ‘फ्लीट एज’ देखील सादर करते. वाहनांव्‍यतिरिक्‍त कंपनी स्थिर पाठिंबा व सोयीसुविधेची खात्री देते, ज्‍यामुळे व्‍यवसाय प्रत्‍येक टप्‍प्‍यावर सक्षम होत आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments