Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूकीसंबधीचे कामकाज जबाबदारीने पार पाडावे-निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले*

निवडणूकीसंबधीचे कामकाज जबाबदारीने पार पाडावे-निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले*

*

पुणे,दि.२२:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज महत्त्वाचे व जबाबदारीचे आहे. सर्व संबंधित नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेले कामकाज अत्यंत जबाबदारीने आणि वेळेवर पार पाडावे असे आवाहन मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले.

निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयात सर्व नोडल अधिकारी याची बैठक आयोजित करण्यात आली होती. उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीत आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री.नवले यांनी यावेळी निवडणूक प्रक्रिया, विविध पथकांनी करावयाची कार्ये आणि पार पाडावयाच्या जबाबदारी, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक उपक्रम (स्वीप) यावर मार्गदर्शन केले.

बैठकीस मीडिया कक्ष नोडल अधिकारी श्रीमती रश्मी ओव्हाळ, सी-व्हिजील कक्षाचे अविनाश खैरे, एक खिडकी कक्षाचे विशाल कोतागडे, निवडणूक खर्च कक्षाच्या अर्चना शेवते, आचार संहिता कक्ष नोडल अधिकारी के.के.प्रधान उपस्थित होते.
०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments