Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorized'माझी सोसायटी जागरूक सोसायटी' उपक्रमाद्वारे मतदानासाठी जनजागृती

‘माझी सोसायटी जागरूक सोसायटी’ उपक्रमाद्वारे मतदानासाठी जनजागृती

**

पुणे,दि.२२: मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) द्वारे मतदारांनी निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार संघातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘माझी सोसायटी जागरूक सोसायटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोसायटीतील रहिवाशांकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावणेबाबतची संकल्पपत्रे भरुन घेण्यात आली. यावेळी स्वीप कक्षांतर्गत सोसायटीमधील मराठी न समजणाऱ्या नागरिकांकडून ‘माय सोसायटी, कॉन्शीयस सोसायटी’ अशा शीर्षकाची संकल्पपत्रे भरून घेण्यात आली.

इंडियन्स ग्रिनडेल सोसायटी, ऑरेंज ब्लॉसम स्पेशल सोसायटी, कमला मेंशन सोसायटी, कोणार्क ए प्लस सोसायटी,फ्लॉवर बेलवेडर सोसायटी, गंगा क्वीन सोसायटी, गंगा मेलो सोसायटी, लॉरेनटाइम सोसायटी,गंगा स्वस्तिक सोसायटी, सप्तगिरी सहकारी सोसायटी, सागर रेसिडेन्सी सोसायटी, अमर अँबियन्स सोसायटी, साई रॉयल्स सोसायटी या सोसायटीतील रहिवाशांनी सहभाग घेतला. जवळपास आठशे ऐंशी मतदारांना संकल्पपत्रांचे वाटप करण्यात आले होते.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments