*
पुणे, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाकडून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. ए. वेंकादेश बाबू यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली आहे.
डॉ. ए. वेंकादेश बाबू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, ग्रीन बिल्डींग, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा असून भ्रमणध्वनी क्रमांक ९२२६१८४५५४ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी हरिश बोरावके हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८८१३६०३६६ आणि ९७०२४१३०१८ असा आहे. डॉ. ए. वेंकादेश बाबू हे सकाळी १० ते ११ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे या ठिकाणी भेटतील, अशी माहिती खेड आळंदी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दिली आहे.
0000


