Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी* खडकवासला...

निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी* खडकवासला विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांचे निर्देश

*

पुणे, दि. २५ : निवडणुकीतील पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने या कालावधीत शांतता राखणे, गैरव्यवहार टाळणे आणि जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी पोलीस दलाने समन्वय ठेऊन आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देश खडकवासला विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिले.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. माने बोलत होते.

यावेळी तहसीलदार किरण सुरवसे, अंकुश गुरव आदी उपस्थित होते. निवडणूक कालावधीत शांतता राखणे, गैरव्यवहार टाळणे आणि जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देणे कायदा व सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. पोलिसांची भूमिका संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्वाची आणि तितकीच जबाबदारीची असते. कामकाज करताना निवडणुक प्रशासनासमवेत समन्वय असला पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. माने यांनी त्यादृष्टीने महत्वाच्या सूचनादेखील दिल्या. या शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी पोलीस दलाच्या निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. कायदेशीर प्रक्रियेबाबत सखोल माहिती तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्षमता वाढवण्याचे यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा उपयोग पोलीस दलाला त्यांच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी होणार आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments