*
पुणे,दि.२५:- निवडणुक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक विषयक कामकाज कर्तव्यात कुठल्याही प्रकारचा कसूर, दिरंगाई व निष्काळजीपणा करु नये आणि निवडणूक कामकाज जबाबदारीने पार पाडावे असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांचे निर्देश यांनी दिले.
पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, निवडणूक नायब तहसिलदार चित्रा ननावरे यावेळी उपस्थित होते.
बैठकीत हिशोब तपासणी पथक, वाहन अधिग्रहण व्यवस्थापन वाहतुक आराखडा, स्वीप व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, जनसंपर्क व प्रसिध्दी कक्ष, मतदार यादी व्यवस्थापन, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष, निवडणूक निरिक्षक व्यवस्थापन, एक खिडकी कक्ष , डॅशबोर्ड मॉनिटरींग कक्ष, दिव्यांग कक्ष, मनुष्यबळ, मतपत्रिका छपाई व वाटप, कर्मचारी कल्याण कक्ष, नामनिर्देशन पथक, ओळखपत्र वाटप, इनकोर इत्यादी पथकाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. सध्या नामनिर्देशन दाखल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. नामनिर्देशन पत्रे अंतिम झाल्यानंतर सर्व निवडणूक पथकांचे काम वाढणार आहे. त्या दृष्टीने समन्वय अधिकारी यांनी निवडणूक विषयक कामकाजाची सर्वतोपरी पूर्वतयारी करुन ठेवावी, तसेच निवडणुकीचे गांभीर्य ओळ्खून आपली जबाबदारी राष्ट्रीय कर्तव्य या भावनेने पार पाडावी व निवडणुकीच्या कर्तव्यात कुठल्याही प्रकारचा कसूर, दिरंगाई व निष्काळजीपणा करु नये असे निर्देश दिले.बैठकीला विविध पथकांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
०००


