Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती

थेरगाव, दि. २६ ऑक्टोबर २०२४ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन मतदान जनजागृती रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.
शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दृष्टीने २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या स्वीप टीमच्या वतीने विकासनगर , किवळे या परिसरात मतदान जनजागृती रॅली तसेच मतदार शपथ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान अशा घोषणा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी विविध घोषणांचे फलक हाती घेऊन मतदारांचे लक्ष वेधून घेतले.
अभियानाच्या माध्यमातून विकासनगर, किवळे परिसरातील गृहसंस्था, कॉलनी, चौकांमध्ये रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. स्वीप टीमने परिसरातील मतदारांशी चर्चा करून लोकशाहीत मतदानाचे महत्व, नवमतदारांसाठी मतदानाची प्रक्रिया, मतदार यादीमध्ये नाव शोधण्याची प्रक्रिया आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
याव्यतिरिक्त, रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांकडून “भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थिती वापर करील. मी मतदान करून आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहीत करीन. मी कोणत्याही भीतीपोटी, लालसोपोटी मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडीन,” अशा आशयाची संकल्प पत्रे देखील घेण्यात आली.
दरम्यान, काळेवाडी, बी आर टी रोड जवळील मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानामध्ये सकाळी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या स्वीप टिमच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रम तसेच शपथ अभियान राबविण्यात आले. यावेळी उद्यानात उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दर्शवत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments