Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedहडपसर मतदारसंघ निवडणूक खर्च तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जाहीर*

हडपसर मतदारसंघ निवडणूक खर्च तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जाहीर*

*

पुणे,दि.२६:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. नागरीकांना निवडणूक खर्च विषयक व आचारसंहिता भंग झाल्याबाबत तक्रार द्यावयाची असल्यास ०२०२९९१०७१५ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी कळविले आहे.

*मतदार सहाय्यता कक्ष स्थापन*

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सपना रहाटे ७७४१९०७३५६, राजश्री जाधव ८६०५५८२२६५, खुशी खुडे ८९९९९८०३९८, श्वेता ढावरे ८७६७०९७८९१ यांच्या भ्रमणध्वनीवर मतदारांना संपर्क साधता येईल.
०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments