Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक कामकाजाकरीता नियुक्त दोन हजार अधिकाऱ्यांना हडपसर येथे प्रशिक्षण*

निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त दोन हजार अधिकाऱ्यांना हडपसर येथे प्रशिक्षण*

*

पुणे, दि. २७: हडपसर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त २ हजार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण महानगरपालिकेच्या विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले.

यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील, अमोल पवार, महेश सुधळकर, प्रशिक्षण समन्वय अधिकारी रवी आयवळे, सहायक समन्वय अधिकारी नितीन सहारे, नायब तहसीलदार जाई कोंडे आदी उपस्थित होते.

दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुधळकर यांनी मतदान यंत्राबाबत अत्यंत सोप्या भाषेत माहिती देऊन हाताळणीबाबत प्रात्यक्षिक दाखवले. या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रत्येक मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळली व त्या संबंधीची सर्व माहिती प्रात्यक्षिकांच्या आधारे करुन घेतली. प्रशिक्षणाला सर्व अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच हाताळणीसंदर्भात शंकाचे निरसन करून घेतले.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments