Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकसबा पेठ व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

कसबा पेठ व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

*

पुणे, दि. २७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्याअनुषंगाने कसबा पेठ व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूकीचे कर्तव्य बजावणाऱ्या मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी यांच्याकरिता निवडणूक प्रक्रिया व ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण गणेश कला क्रीडा रंगमंच आणि अप्पासाहेब जेधे विद्यालय येथे संपन्न झाले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत येवले, तहसीलदार सुषमा पैकिकरी, प्रवीणा बोर्डे, शामल चिनके, रवींद्र मेढे, नितीन गायकवाड, सतीश वगे, गजानन जाधव आदी उपस्थित होते.

श्रीमती किसवे-देवकाते यांनी मतदान केंद्रांवरील मतदान अधिकारी यांना निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या आदीबाबत मार्गदर्शन दिले.

यावेळी पोस्टल मतदान प्रक्रियेसाठीची नोंदणी प्रक्रिया नायब तहसीलदार शीतल देसाई आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र हाताळणीबाबत, संपूर्ण मतदान प्रक्रिया तसेच मतदानाच्या अनुषंगाने करावयाच्या सर्व आवश्यक कौशल्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त तंत्रज्ञान तज्ज्ञ, सेक्टर अधिकारी, सहाय्यक सेक्टर अधिकारी व इतर अधिकारी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान अधिकारी व इतर असे एकूण १ हजार ८०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments