Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन*हे

मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन*हे

*

पुणे, दि. २८: भारत निवडणूक आयोगाच्या आवाहनानुसार मावळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी ४३५ शाळांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी १७ हजार विद्यार्थ्यांनी आई- बाबांकडून संकल्पपत्र भरून घेऊन मतदानाचे आवाहन केले.

या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, विविध पथनाट्य, प्रभात फेरी, घोषवाक्य स्पर्धा, भेट कार्ड वाटप अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच बस स्थानक एसटी स्थानक, उद्याने नाना नानी पार्क, औद्योगिक वसाहत, महिला मतदार, आजी आजोबांची भेट, युवांमध्ये मतदान जागृती केली. तसेच मागील विधानसभेमध्ये ५० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करून मतदारांची जागृती करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी के के प्रधान, सहायक गटविकास अधिकारी थोरात, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज,नायब तहसीलदार जयश्री मांडवे यांनी सहकार्य केले.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments