Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedफॉग्सी उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यात संपन्न देशात नवजात बालकांसाठी अधिक पायाभूत...

फॉग्सी उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यात संपन्न देशात नवजात बालकांसाठी अधिक पायाभूत सुविधांची गरज : डॉ.जयदीप टंक

पुणे,28 ऑक्टोबर 2024 : भारतात एकीकडे मूदतपूर्व जन्मलेल्या बालकांची संख्या आणि त्यामुळे होणारे आजार वाढत असताना नवजात बालकांसाठी अधिक पायाभूत सुविधांची गरज,मनुष्यबळ आणि स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञांमध्ये सहयोगाची गरज आहे,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.

द पुणे ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनॅकोलॉजी सोसायटी (पीओजीएस),द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनॅकोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्सी) आणि भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजचा स्त्रीरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फॉग्सी उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यात नुकतीच पार पडली. टुवर्डस झीरो प्रीटर्म बर्थस ही या परिषदेची संकल्पना होती.

या दोन दिवसीय परिषदे दरम्यान विविध कार्यशाळा, शोधनिबंध व पोस्टर प्रेझेंटेशन आणि बीजभाषणे पार पडली. या परिषदेमध्ये स्त्रीरोग तज्ञ,प्रसूती तज्ञ,नवजात तज्ञ आणि बालरोग तज्ञ सहभागी झाले होते.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फॉग्सीचे अध्यक्ष डॉ.जयदीप टंक तसेच इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.वसंत खळतकर, फॉग्सीच्या प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.सुनिता तांदूळवाडकर, पीओजीएसच्या अध्यक्ष डॉ.आरती निमकर, पीओजीएसच्या सचिव मीनाक्षी देशपांडे, परिषदेच्या आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ.गिरीजा वाघ व आयोजन समितीच्या सचिव डॉ.वैशाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना फॉग्सीचे अध्यक्ष डॉ.जयदीप टंक म्हणाले की,मूदतपूर्व जन्मलेल्या बालकांना अल्पकालीन व दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. देशात नवजात बालक चिकित्सा अजून सर्वांपर्यंत पोहचली नसून या संदर्भात पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.त्यादृष्टीने आम्ही काम करत असून बालरोग तज्ञांच्या सहयोगाने उच्च गुणवत्तेची नवजात बालक चिकित्सा सेवा अधिक नवजात बालकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत , तसेच कांगारू मदत केअर या नवीन संकल्पनेला प्रोत्साहन देत आहोत.

नवीन तंत्रज्ञानाविषयी ते म्हणाले की,बिग डाटामध्ये भरपूर क्षमता आहे.कृत्रिम बुध्दिमत्तेने मोठ्या माहितीसाठ्याचे विश्लेषण करून जोखमीचे घटक,प्रतिबंधात्मक आणि भविष्यसूचक परिणाम नेमके कोणते आहेत,हे ओळखण्यास भविष्यात मदत होऊ शकते.

इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.वसंत खळतकर म्हणाले की, मुदतपूर्व जन्म हे मोठे आव्हान असून याचे दीर्घकाळ परिणाम होतात.आयुष्याची सुरूवातीची वर्षच नव्हे तर जीवनकालाच्या पुढच्या मार्गावरही परिणाम होऊ शकतो.यासाठी प्रसूतीतज्ञ आणि बालरोग तज्ञ यांच्यात भागीदारीची आवश्यकता आहे.

याप्रसंगी डॉ.गिरीजा वाघ यांनी प्रीटर्म लेबर याविषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.त्याचबरोबर डॉ.अनघा पैरायतुरकर यांनी संपादित केलेल्या परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

क्लाऊड9 हॉस्पिटल्सचे संस्थापक डॉ.किशोर कुमार,क्लिनिकल जेनेसिस्ट डॉ.चित्रा प्रसाद,प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.मार्क ईव्हान्स आणि डॉ.मीनू अगरवाल या सर्व मान्यवरांचे त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.डॉ.उमा वानखेडे यांना रील मेकिंग स्पर्धेच्या विजेत्या म्हणून घोषित करण्यात आले.

आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ.गिरीजा वाघ म्हणाल्या की,ऑक्टोबर हा महिना मुदतपूर्व जन्माला आलेल्या बालकांविषयी जागृतीसाठी पाळला जातो.त्यामुळे योग्य वेळेस ही परिषद पार पडत आहे.

आयोजन समितीच्या सचिव डॉ.वैशाली चव्हाण यांनी आभार मानले.

डॉ.गिरीजा वाघ यांना तब्बल तीन दशकांचा अनुभव असून महिला सक्षमीकरणासाठी त्या सतत कार्यरत असतात.डॉ.वैशाली चव्हाण यांनी महिला आरोग्यामध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टीने उपचारांच्या पलीकडे जाऊन हा दृष्टीकोन ठेवत सातत्याने प्रयत्न केले आहेत. टुवर्डस झीरो प्री टर्म बर्थस हा परिषदेसाठी निवडलेला विषय सहयोगी प्रयत्नातून निरोगी समुदाय बनविण्याची पीओजीएसची सांघिक दृष्टी प्रतिबिंबित करते.

Add reaction

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments