Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकशाहीच्या उत्सवात मतदानरुपी दीप प्रज्वलित करणार;* *दिवाळी पहाट कार्यक्रमात शेकडो मतदारांचा...

लोकशाहीच्या उत्सवात मतदानरुपी दीप प्रज्वलित करणार;* *दिवाळी पहाट कार्यक्रमात शेकडो मतदारांचा मतदान करण्याचा संकल्प*

पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर २०२४* :- दिवाळीत जसे प्रत्येक घरात दीप प्रज्वलन केले जाते, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा दीप लोकशाहीच्या निवडणूकरुपी उत्सवात लावावा. त्यातून देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल, पारदर्शक आणि न्याय होईल, असा संदेश देत महापालिकेच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात सुमारे ७०० मतदारांनी मतदान करण्याचा संकल्प केला आणि शपथ घेतली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वतीने निगडी येथील ग.दि माडगूळकर नाट्यगृह येथे दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त पंकज पाटील, गायक पं. अजितकुमार कडकडे, नागेश आडगावकर महापालिकेच्या स्वीप टीम, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किसन केंगले, लिपिक अभिजीत डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार यांच्यासह चिंचवड विधानसभा स्वीप नोडल अधिकारी राजीव घुले, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, प्रिन्स सिंह, अंकुश गायकवाड, सचिन लोखंडे, मनोज माचरे, भोसरी विधानसभा स्वीप अमोल फुंदे व बी एल ओ नोडल अधिकारी हरीभाऊ साबळे, नाट्यगृहाचे व्यवस्थापक अतुल काळे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोसरी औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी घेतली मतदान करण्याची शपथ

भोसरी औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत शपथ घेतली. कामगारांच्या भवितव्यासाठी आवर्जून मतदान करणार असल्याची भावना कामगारांनी यावेळी व्यक्त केली. तसेच टॅकलक्राफ्ट कंपनीचे संचालक निलेश मोहिते यांनी कामगारांना मतदान करण्यासाठी पगारी सुट्टी देणार असल्याचे सांगितले.

मजुरांनी केला मतदानाचा संकल्प

कुदळवाडी आणि भोसरी येथील मजूर अड्ड्यावर मजुरांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचा संकल्प केला. यावेळी महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या मताचे महत्व कामगारांना पटवून देण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांचे प्रबोधन तसेच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत माहिती देण्यात येत आहे.

डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा मतदान करण्याचा निर्धार

भोसरी येथील महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा निर्धार केला असून महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार जनजागृती मोहिमेची माहिती परिसरातील लोकांना देऊन नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे मत रुग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे यांच्यासह डॉक्टर्स, नर्स, रुगणालयातील कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments