*
पुणे, दि. २९: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे तसेच अन्य शंकाचे निरसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या-‘नो युवर पोलींग स्टेशन’ कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयात नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र ‘नो युवर पोलींग स्टेशन’ कक्ष्ा स्थापन करण्यात आले असून ८८८८००६६६६ व ०२०-६७३३९९९९ हे सारथी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहे. कक्षाचे कामकाज कार्यालयीन वेळेत २० नोव्हेंबर २०२४ अखेर मतदान प्रक्रिया संपेपर्यंत सुरू राहील.
क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता, नो युवर पोलींग स्टेशन कक्षासाठी नियुक्त नियंत्रण अधिकारी यांचे नाव व पदनाम, कर्मचाऱ्यांचे नाव पुढीलप्रमाणे आहे. क्षेत्रीय कार्यालय ‘अ’: भेळ चौक, निगडी प्राधिकरण, नियंत्रण अधिकारी- शितल शिंदे, कर्मचारी- माया जाधव, योगेश भांगले, क्षेत्रीय कार्यालय ‘ब’: लिंकरोड, एल्प्रो मॉल जवळ, चिंचवड, नियंत्रण अधिकारी- अमित पंडीत, कर्मचारी- अवण्णा कोळी, पल्लवी बेलसरे, क्षेत्रीय कार्यालय ‘क’: नेहरूनगर,भोसरी, नियंत्रण अधिकारी- तानाजी नरळे, कर्मचारी- माधवी चौगुले, शुभांगी साळी, क्षेत्रीय कार्यालय ‘ड’: औंध रावेत बीआरटी रोड, रहाटणी, नियंत्रण अधिकारी- श्रीकांत कोळप, कर्मचारी- बाबासाहेब हिवराळे, श्रद्धा शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालय ‘ई’ पत्ता ग्रोथ लॅब बिल्डींग, पांजरपोळ समोर, भोसरी साठी नियंत्रण अधिकारी-राजेश आगळे, कर्मचारी- शितल थोरात, गोविंद पखाले, क्षेत्रीय कार्यालय ‘फ’: लोकमान्य टिळक चौक, निगडी, नियंत्रण अधिकारी- सिताराम बहुरे, कर्मचारी- रमा बहिरवाडे, शेख आशु, क्षेत्रीय कार्यालय ‘ग’: दिलिप वेंगसरकर क्रिकेट ॲकेडमी, थेरगाव, नियंत्रण अधिकारी-किशोर ननवरे, कर्मचारी-सुमेध कांबळे, आकाश आगळे, क्षेत्रीय कार्यालय ‘ह’: महिला आयटीआय, कासारवाडी, नियंत्रण अधिकारी-उमेश ढाकणे, कर्मचारी-पुकराज शिंदे, समता ओंकार यांची नियंत्रण अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
0000


