*
पुणे, दि. 29 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 198 शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या तहसिल कार्यालय येथे स्थापित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. वेंकादेश बाबु यांनी भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगिता राजापुरकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के आदी उपस्थित होते. श्री. वेंकादेश बाबु यांनी खर्च विभाग, भरारी पथक, व्हिडीओ पाहणी पथक, आचार संहिता कक्ष, सि-व्हिजिल ॲप, पेड न्यूज तसेच माध्यम संनियंत्रण पथकाच्या कामकाजाची माहिती घेवून आढावा घेतला.
दरम्यान, शिरूर विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. दोन सत्रामध्ये झालेल्या प्रशिक्षणामध्ये एकूण 3 हजार 36 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
0000


