Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक निरीक्षक के. हिमावती यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा*

निवडणूक निरीक्षक के. हिमावती यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा*

*

पुणे , दि.30: निवडणूक निरीक्षक म्हणून के. हिमावती यांनी कै अनुसायबाई खिलारे मॉडेल स्कुल एरंडवणा येथील कोथरूड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी आदी यांनी त्यांचे स्वागत केले.
निवडणूक निरीक्षक के. हिमावती मंगळवारी, (दि 29 ऑक्टोबर) रोजी नामनिर्देशन प्रक्रियेची व निवडणूक विषयक विविध कामकाजाची पाहणी केली.
निवडणूक निरीक्षक के पद्मावती यांचा निवासाचा पत्ता व्ही व्ही आय पी सर्किट हाऊस ए- 205 पुणे असा आहे संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9226938265 हा असून दूरध्वनी क्रमांक 020-29525172 असा आहे त्याचप्रमाणे निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी दिगंबर हौसारे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405306999 असा आहे.
निवडणुक निरीक्षक यांना व्हीआयपी सर्किट हाऊस पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गाढे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments