मुंबई, ४ नोव्हेंबर २०२४ : महिंद्रा समुहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’ने (एफईएस) ऑक्टोबर २०२४ या महिन्यात झालेल्या ट्रॅक्टर विक्रीचे आकडे आज जाहीर केले.
ऑक्टोबर २०२४ मध्ये महिंद्राच्या ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री ६४,३२६ युनिट्स इतकी होती. गेल्या वर्षी, ऑक्टोबर २०२३मध्ये ही विक्री ४९,३३६ युनिट्स होती.
ऑक्टोबर २०२४मध्ये ट्रॅक्टर्सची विक्री (देशांतर्गत + निर्यात) ६५,४५३ युनिट्स झाली. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री ५०,४६० युनिट्स इतकी होती. या महिन्यात १,१२७ युनिट्सची निर्यात झाली.
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, “आम्ही या ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत बाजारात ६४,३२६ ट्रॅक्टरची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ३० टक्के जास्त आहे. अनेक सकारात्मक घटक एकत्र आल्याने यंदा ट्रॅक्टर उद्योगात अतिशय मजबूत वाढ दिसून आली आहे. खूप चांगला पाऊस, चांगले खरीप पीक, रब्बी पिकांना मदत करणारी उच्च जलसाठ्याची पातळी आणि मुख्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीची सरकारची घोषणा, हे त्यातील उल्लेखनीय घटक म्हणता येतील. सणासुदीच्या सध्याच्या काळात सकारात्मक भावनांना गती मिळतअसल्याने, येत्या काही महिन्यांत ट्रॅक्टरची मागणी मजबूत राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. निर्यात बाजारात आम्ही १,१२७ ट्रॅक्टर विकले आहेत.”
फार्म इक्विपमेंट सेक्टर सारांश
ऑक्टोबर महिना
चालू वर्षातील ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी
आर्थिक वर्ष २०२५
आर्थिक वर्ष २०२४
तफावतीची टक्केवारी
आर्थिक वर्ष २०२५
आर्थिक वर्ष २०२४
तफावतीची टक्केवारी
देशांतर्गत विक्री
६४३२६
४९३३६
३० %
२७०५६२
२४८०६०
९ %
निर्यात
११२७
११२४
० %
९७४०
७४७०
३० %
एकूण विक्री
६५४५३
५०४६०
३० %
२८०३०२
२५५५३०
१० %
*निर्यातीत सीकेडीचा समावेश.


