Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*दौंड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर*

*दौंड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर*

दौंड , दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार दौंड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तहसील कार्यालय, दुसरा मजला, मिटींग हॉल , दौंड येथे ही तपासणी करण्यात येईल. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी तर दुसरी १४ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments