Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी विधानसभा उमेदवारांचा खर्च तपासणी वेळापत्रक

पिंपरी विधानसभा उमेदवारांचा खर्च तपासणी वेळापत्रक

पिंपरी – दि. ०६ नोव्हेंबर २०२४ – लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१चे कलम ७७ नुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चाचे दैनंदिन स्वतंत्र हिशोब ठेवणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या सर्व दैनंदिन खर्चाची नोंद करणे आवश्यक आहे.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यासाठी पथकाची स्थापना २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात आलेली आहे. उमेदवाराचे निवडणूक खर्च तपासणी अ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय , निगडी प्राधिकरण पुणे-४११०४४ येथील २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात मा.निवडणूक खर्च निरिक्षक श्री. प्रेम प्रकाश मीना (आय.आर.एस.) यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.

सदर तपासणी तीन टप्प्यात होणार आहे. खर्चाची पहिली तपासणी दिनांक १०/११/२०२४, दुसरी तपासणी दिनांक १४/११/२०२४ आणि तिसरी तपासणी दिनांक १९/११/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.

लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१चे कलम ७८ नुसार उमेदवाराने निवडणुक खर्चाचा हिशोब वेळेत सादर करण्यात यावा याची सर्व निवडणुक लढविणा-या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे.

सोबत तक्ता

निवडणूक खर्चाच्या सूचनांचा सारग्रंथ २०२४ – मधील C-१० व समदिनांकित आदेशान्वये उमेदवार निवडणूक खर्चाची तपासणी व अनुषंगिक बाबींचे वेळापत्रक

अ.क्र

तपासणी क्र.

तपासणी दिनांक

उमेदवार निवडणूक खर्च तपासणीचा कालावधी

तपासणीचे स्थळ

वेळ

पहिली

१०/११/२०२४

नामांकन दाखल दिनांकापासून ते दिनांक ०८/११/२०२४ अखेर पर्यंत

अ क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, संत ज्ञानेश्वर चौक (भेळ चौक) निगडी प्राधिकरण पुणे ४११०४४

सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत

दुसरी

१४/११/२०२४

दिनांक ०९/११/२०२४ ते दिनांक १२/११/२०२४ अखेर पर्यंत

तिसरी

१९/११/२०२४

दिनांक १३/११/२०२४ ते दिनांक १७/११/२०२४ अखेर पर्यंत

नोट – १. तपासणी दिनांका दिवशी उमेदवार अथवा त्यांचा अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनीच उपस्थित

राहावे.

२. तपासणी दिनांका व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिवशी नोंद वही तपासली जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments