Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedदौंड विधानसभा मतदार संघात ३ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्रे*

दौंड विधानसभा मतदार संघात ३ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्रे*

*

पुणे,दि. ७: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दौंड विधानसभा मतदार संघात ३ साहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार यांनी दिली आहे.

या बदलानुसार यापूर्वीचे मतदान केंद्र क्र. २३३ जिल्हा परिषद शाळा पाटस उत्तरभिमुख पूर्वेकडील पहिली इमारत पूर्वेकडील खोली क्र. ४ या मतदान केंद्राला साहाय्यकारी मतदान केंद्र क्र. २३३अ जिल्हा परिषद शाळा पश्चिममुखी खोली क्र.२, मतदान केंद्र क्र. २७८ जिल्हा परिषद शाळा पांढरेवाडी दक्षिणेकडील खोली क्र. १ या मतदान केंद्राला साहाय्यकारी मतदान केंद्र क्र. २७८अ जिल्हा परिषद शाळा पांढरेवाडी दक्षिणेकडील खोली क्र. २, मतदान केंद्र क्र. ३०० जिल्हा परिषद शाळा नंदादेवी पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडील खोली क्र. २ या मतदान केंद्राला साहाय्यकारी मतदान केंद्र ३००अ जिल्हा परिषद शाळा नंदादेवी पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडील खोली क्र. ४ असे नवीन सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

या भागातील मतदारांनी नवीन साहाय्यकारी मतदान केंद्रांची नोंद घ्यावी. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन येत्या २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन श्री. शेलार यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments