Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपा मॉलतर्फे 'Foo' हे पुण्यातील नवीन आशियाई तपस स्थळ सादर

कोपा मॉलतर्फे ‘Foo’ हे पुण्यातील नवीन आशियाई तपस स्थळ सादर

पुणे, 08 नोव्हेंबर २०२४: खमंग पदार्थ आणि परिपूर्ण खाद्य अनुभवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आशियाई तपस रेस्टॉरंट, Foo, चे स्वागत कोपा मॉल उत्साहाने करत आहे. कोरेगाव पार्कच्या मध्यभागी असलेला कोपा मॉल पुण्यातील अत्याधुनिक प्रीमियर जीवनशैलीचे महत्वपूर्ण स्थान असून पेबल स्ट्रीट हॉस्पिटॅलिटीच्या सुप्रसिद्ध थाम बंधू, रायन आणि कीनन यांच्या Foo ची यात भर पडल्यामुळे तर कोपाच्या वैविध्यपूर्ण खाद्य अनुभवांमध्ये एक नवा आयाम जोडला गेला आहे.

पुरस्कार-विजेता नावलौकिक आणि खमंग स्वादासाठी ओळखले जाणारे Foo, कोपा मॉलच्या नजाकत आणि शैलीदार वातावरणात एक अनोखा स्पर्श आणते. Foo चे हे भारतातील 12 वे आणि पुण्यातील पहिले स्थळ आहे. पुण्याच्या खाद्य संस्कृतीला एक अनोखा अनुभव देण्यास ते सज्ज आहेत.

“Foo ला अधिकाधिक पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचा एक भाग म्हणून पुण्यातील कोपा मॉलमध्ये आम्ही आमचे 12 वे रेस्टॉरंट उघडण्याबाबत अत्यंत उत्साहित आहोत,” असे पेबल स्ट्रीट हॉस्पिटॅलिटीचे संस्थापक कीनन आणि रायन थाम यांनी सांगितले. “पुणे हे एक उत्साहाने भारलेले आणि सातत्याने विकसित होणारे शहर आहे. अशा ठिकाणी वैविध्यपूर्ण आणि गतिमान खवय्यांसाठी Foo चा अनुभव सादर करणे आमच्यासाठी रोमांचक आहे. Foo मेनूचे स्वागत पुणेकर कसे करतात हे पाहण्याची आम्हाला उत्सुकता आहे!”

3000 चौरस फुटात पसरलेले Foo कोपा एक सुंदर आणि उबदार वातावरण सादर करते. त्याचे डिझाइन एस्साजीज अटेलियरच्या सारा श्याम यांनी केले आहे. समृद्ध लाल रंगाच्या छटा, सूक्ष्म, नाजुक बारीक डिझाईन पासून काळ्या धातूच्या गजाच्या रचनेचे नाट्यपूर्ण तपशील आणि क्रिस्टल घटक यासह प्रत्येक तपशील कोपाच्या वैभवशाली आणि आतिथ्यशील वातावरणाची कल्पना अधिक उंचावतात. अंतर्गत आणि बाह्य बैठक व्यवस्थेच्या पर्यायांसह कोपा मॉलमधील Foo चे स्थळ मित्र आणि कुटुंबासह आराम करण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे.

अविस्मरणीय वातावरणासोबत, Foo च्या मेनूमध्ये 100 पेक्षा जास्त आशियाई तपस पर्याय आहेत. त्यात सुशी आणि डिमसम पासून Foo येलो करी आणि Foo ब्लू बटर जपानी फ्राइड राईस यांचा समावेश आहे. शेफ एरिक सिफू यांनी बनवलेली प्रत्येक डिश पाहुण्यांना प्रत्येक घासात खमंग स्वाद शोधण्यास आमंत्रित करते. अनुभवाला अधिक रोमांचक बनवण्यासाठी, Foo मध्ये नाविन्यपूर्ण कॉकटेल, Foo ब्रू जपानी शैलीचे राईस बिअर, तसेच विस्तृत अल्कोहोल मुक्त मेनू आहे. त्यामुळे सर्व अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

Foo ची भर पडल्यामुळे, कोपा मॉलने विविध प्रकारच्या चवी आणि प्रसंगांसाठी अतुलनीय खाद्य आणि रिटेल अनुभव प्रदान करण्यावर आपले लक्ष अधिक केंद्रित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments