Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपा पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरच्या प्रमुखपदी अमोल कविटकर पुण्यात पश्चिम...

भाजपा पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरच्या प्रमुखपदी अमोल कविटकर पुण्यात पश्चिम महाराष्ट्र मिडिया सेंटर कार्यान्वित

पुणे (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर येथे विभागीय मीडिया सेंटर उभारण्यात आली असून, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्ये व प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार पुणे विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटर प्रमुखपदी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पश्चिम महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर त्याचप्रमाणे विदर्भ सेंटर प्रमुखपदी चंदन गोस्वामी यांची तर ठाणे व कोकण सेंटर प्रमुख पदी सागर भदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत हे मीडिया सेंटर कार्यरत राहतील. नुकतेच पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरचे उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. या मिडिया सेंटर अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे येथील भाजप पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटर हे नातूबाग येथील भारत भवनमध्ये उभारण्यात आले असून हे या केंद्रामध्ये मुख्य सभागृहात पत्रकार परिषदा, पत्रकार संवाद आयोजित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र माध्यम विभाग कक्ष, संगणक कक्ष, प्रिंट मिडिया कक्ष, इलेक्ट्रिक मिडिया कक्ष व यू ट्युबर्स कक्ष अशा सर्व सोयीनी युक्त या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान या मिडिया सेंटरमध्ये पत्रकार बांधवांशी तसेच इलेक्ट्रोनिक माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून पक्षाच्या कामकाजाविषयी तसेच उमेदवारांचे दौरे, सभा आदि गोष्टींची माहिती या सेंटरतर्फे देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments