पुणे : बारामती ब्लास्टर्स, अलोक इलेव्हन संघांनी निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर लीग एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आपापल्याला प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या लढतीत बारामती संघाने इशिका इलेव्हन संघावर २२ धावांनी सहज विजय मिळवला. बारामती संघाने दिलेल्या ८९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इशिका संघाचा डाव ६६ धावांत आटोपला. यात राजेश सोराटेने अष्टपैलू कामगिरी केली.
दुसऱ्या लढतीत अलोक इलेव्हन संघाने संडीज सिम्बा संघावर ९ गडी राखून मात केली. सिम्बा संघाचा डाव ७.१ षटकांत ५२ धावांत आटोपला. यानंतर अलोक संघाने विजयी लक्ष्य १ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.
धावफलक : बारामती ब्लास्टर्स – ८ षटकांत ८ बाद ८८ (अक्षय तावरे ३४, राजेश सोराटे १६, संतोष लष्कर १०, ओंकार गायकवाड ३-१९, हाजीमस्तान कुरेशी २-२०, शफिक शेख १-१७) वि. वि. इशिका इलेव्हन – ८ षटकांत सर्व बाद ६६ (शफिक शेख २१, आझाज कुरेशी १४, अजिंक्य गोळे १३, संतोष लष्कर ३-१३, राजेश सोराटे २-१३).
सिम्बा इलेव्हन – ७.१ षटकांत सर्व बाद ५२ (पप्पू तोडकर १०, राहुल सातव ३-१७, अभिषेक कुजूर २-१४, क्षितिज दिवेकर २-८, विकास सुरवसे २-१२) वि. वि. अलोक इलेव्हन – ४.४ षटकांत १ बाद ५४ (राहुल सातव नाबाद २८, राजू पाटे १२, साहिल पवार १-४).


