पुणे, १३ नोव्हेंबर २०२४ – या नोव्हेंबर महिन्यात कोपा मॉल तुम्हाला पुण्यातील पहिल्या कॉफी फेस्टिवलसाठी आमंत्रित करत असून वॉस्सप फ्लीच्या सहकार्याने त्याचे आयोजन केले जात आहे. हा फेस्टिवल १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय फेस्टिवलमध्ये देशभरातील २५ प्रसिद्ध कॉफी रोस्टर्स सहभागी होत सर्वोत्तम ब्लेंड्स, अनोखे ब्रु आणि आकर्षक अनुभव पुणेकरांना घेता येतील.
कोपा मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉफी फेस्टिवलमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही असून त्यात कॉफी कपिंग आणि टेस्टिंग सेशन्सपासून कलात्मक लाते प्रात्यक्षिकांपर्यंत विविध गोष्टींचा तसेच ब्रुइंग तंत्रावर आधारित कार्यशाळांचा समावेश असेल. प्रेक्षकांना खास तयार करण्यात आलेली कॉफी कॉकटेल्स चाखता येणार असून त्यात एसप्रेसो मार्टिनी, कोल्ड ब्रु स्पेशल आणि इतर खास कॉनकॉक्शन्सची चव घेता येईल. त्याचप्रमाणे रूचकर डेझर्ट्स आणि खाद्यपदार्थाचा कॉफीच्या प्रत्येक घोटासह आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर कॉफीच्या स्वादाला पूरक ठरणारे गोड पदार्थ आणि खाद्यपदार्थ यांची चव घ्यायला विसरू नका.
वीकेंडला घेता येणार असलेल्या कॉफीच्या या अनुभवाबरोबरच या फेस्टिवलमध्ये लाइव्ह संगीत असेल, ज्यामुळे पूरण वातावरण आणखी सुखद आणि आवडत्या ब्रुचा आस्वाद घेण्यासाठी योग्य असेल. तुम्ही कॉफीचे दर्जा असाल किंवा फक्त एक कॉफी प्रेमी असाल, हे फेस्टिवल प्रत्येकाला आनंद देईल.
ठिकाण: टेरेस, कोपा मॉल
तारीख: शनीवार- रविवार, १६ आणि १७ नोव्हेंबर
वेळ: दुपारी ३ ते रात्री १०


